Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Mohammad Rafi : ‘बॅक टू बॅक’ रेकोर्ड झालेली ‘ही’ गाणी ५० वर्षांनंतरही आहेत लोकप्रिय!
रेट्रो काळातील सुमधुर गाण्यांच्या मेकिंगच्या गोष्टी आज देखील रसिकांना अचंबित करतात त्या काळात आपली निर्मिती सर्वार्थाने चांगली व्हावी म्हणून सर्व बाजूंनी आणि सर्वांकडून सकारात्मक ऊर्जेने काम केलं जायचं आणि त्यातून तयार झालेली कलाकृती ही खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट अशी असायची. त्या मुळेच आज ही गाणी येऊन पन्नास-साठ वर्षे झाली असली तरी रसिकांना अतिशय जवळची वाटतात आपली वाटतात. हेच या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. (Bollywood retro songs)

सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला संगीतकार सचिन देव बर्मन यांनी एकाच दिवशी दोन गाण्यांचे रेकॉर्डिंग केले होते आणि योगायोगाने ही दोन्ही गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहेत. ही गाणी ध्वनिमुद्रित करताना त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. पण संगीतकार, गायक कलाकार, म्युझिशियनस आणि सर्व स्टाफ या सर्वांनी खूप चांगले सहकार्य केल्यामुळे एकाच दिवशी पाठोपाठ रेकॉर्ड झालेली ही दोन्ही गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहेत. कोणती होती ती दोन गाणी आणि काय होता तो नेमका किस्सा?(Bollywood untold stories)
संगीतकार सचिन देव बर्मन १९७२ साली दोन महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होते. एक होता ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘अभिमान’ आणि दुसरा होता शक्ती सामंत यांचा ‘अनुराग’. या दोन्ही चित्रपटात एका युगल गीतात त्यांना मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा स्वर हवा होता. त्या पद्धतीने त्यांनी गाण्याची रिहर्सल देखील करवून घेतली होती. सचिन देव बर्मन यांची एक पद्धत होती ते गाण्याचे रेकॉर्डिंग दुपारनंतर करत असत. गायकाचा आवाज त्याकाळी त्यावेळी उत्तमरीत्या उमटत असतो अशी त्यांची धारण होती. दोन्ही गाण्याची रिहर्सल झाली होती फक्त रेकॉर्डिंग बाकी होते. (Indian cinema history)

सचिन देव बर्मन यांना या गाण्यांचे रेकॉर्डिंग महबूब स्टुडिओमध्ये करायचे होते. त्यांच्यामध्ये तिथली मशिनरी खूप चांगली होती आणि तिथले रेकॉर्डिंस्ट टागोर अतिशय कुशल असे ध्वनीमुद्रक होते. त्यामुळे त्यांना हा स्टुडिओ त्यांचा कायमचा आवडता असायचा. पण नेमकं याच वेळेला मेहबूब स्टुडिओ मध्ये काहीतरी कारणामुळे संप चालू होता. त्यामुळे या स्टुडिओतील रेकॉर्डिंग कक्ष बंद असायचा. सचिनदा यांचा हा आवडता स्टुडीओ परंतु आता संप चालू असल्यामुळे तिथे रेकॉर्डिंग करणे शक्य नव्हतं. (Entertainment masala)
पण तरीही सचिन देव बर्मन तिथे जाऊन स्टुडिओतील स्टाफशी ते बोलले आणि गाणे रेकॉर्डिंग करणे किती तातडीचे आणि गरजेचे आहे ते सांगितले. सचिन देव बर्मन स्वत: स्टुडीओत येवून आपल्याशी बोलल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना खूपच वेगळे वाटले. यांच्या शब्दाला त्या काळात खूप किंमत होती. तिला स्टाफ आणि तंत्रज्ञांनी ताबडतोब सचिनदांना शब्द दिला की,” तुमच्यासाठी आम्ही हा आमचा जो काही संप आहे तो एक दिवसा करीता थांबवतो आणि आपण आपल्या गाण्याचे रेकॉर्डिंग करून घेऊ!” (Bollywood tadaka)
============
हे देखील वाचा : Anjaan : डिस्को डान्सरची गाणी लिहिताना गीतकार अंजान का नर्व्हस होते?
============
त्या पद्धतीने सचिन देव बर्मन यांनी रफी आणि लता यांना स्टुडिओत बोलवले आणि पहिल्यांदा ‘अभिमान’ या चित्रपटातील ‘तेरी बिंदिया रे..’ या गाण्याचे ध्वनी मुद्रण केले. अतिशय मधुरतेने रसरसलेले हे गीत होते. यानंतर सचिनदा यांनी थोडा ब्रेक घेतला आणि ब्रेक नंतर लगेच ‘अनुराग’ या चित्रपटातील ‘तेरे नैनो की मै दीप जलाऊंगा’ हे गाणे रेकॉर्ड केले. रेकॉर्डिंस्ट टागोर हि गाणी ऐकून खूप एकदम खूष झाले. दोन्ही गाण्यांचे धुनीमुद्रण अतिशय सुंदर झाले होते. सर्व सहाय्यक वादक आणि स्टुडिओ मधील कर्मचाऱ्यांनी खूप चांगले सहकार्य सचिनदा यांना दिले होते. (Mohammad rafi and lata mangeshkar)

गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर जेव्हा पेमेंट करण्याची वेळ झाली तेव्हा असे लक्षात आले की काही पैसे कमी पडत आहेत. तेव्हा मोहम्मद रफी सचिनदादा यांच्याकडे गेले आणि म्हणाले की,” दादा मला आजच्या गाण्याच्या रेकॉर्डिंग चे पैसे नको. आपण मला इथे बोलावले हाच मी माझा सन्मान समजतो!” आणि ते जायला निघाले सचिनदा यांनी त्यांना थांबवले ते म्हणाले,” रफी मियां, असं करू नका माझ्या इज्जतचा सवाल आहे. मी काहीतरी व्यवस्था करतो.” (Bollywood nostalagia)
==============
हे देखील वाचा : Ankhen : या सिनेमाचे पोस्टर एका सिगारेटच्या जाहिरातीवरून बनवले होते!
==============
लगेच त्यांनी शक्ती सामंत यांच्याकडे आपल्या ड्रायवर ला पाठवले आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन आले आणि त्या दिवशी सर्व वादक, कर्मचारी, रेकॉर्डिंस्ट, गायक कलाकार या सर्वांचे व्यवस्थित पेमेंट झाले. सर्वजण आनंदाने स्टुडिओच्या बाहेर पडले सचिनदा देखील एकाच दिवशी आपल्या दोन गाण्यांचे सुंदर ध्वनिमुद्रण झाल्याने खूष होते. ‘अनुराग’ हा चित्रपट डिसेंबर १९७२ मध्ये प्रदर्शित झाला तर अभिमान हा चित्रपट २७ जुलै १९७३ ला प्रदर्शित झाला. ‘अनुराग’ चित्रपटातील हे गाणे मौसमी चटर्जी आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित होते तर ‘अभिमान’ या चित्रपटातील गाणे अमिताभ बच्चन व जया भादुरी यांच्यावर चित्रित होते. हा किस्सा दस्तूर खुद्द सचिन देव बर्मन यांचे ते ड्रायवर अस्लम यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. (Entertainment)