दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ऑस्कर पुरस्काराआधीच RRR चा डंका…
अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी, 12 मार्च रोजी अर्थात भारतात 13 मार्च रोजी ऑस्कर पुरस्काराचा (Oscar Awards) शाही सोहळा होणार आहे. हा सोहळा स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. यासाठी एसएस राजामौली यांचा RRR हा चित्रपट प्रमुख दावेदार मानला जातोय. पण या पुरस्काराआधीच RRR चा जलवा हॉलिवूडवर पसरलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी RRR ची सर्व टीम सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून याच टीमच्या उपस्थितीत RRR चा शो होणार आहे. या शो साठी लॉस एंजिलिसमधले सर्वात मोठे थिएटर हाऊसफूल झाले आहे. 1647 आसनांची क्षमता असलेल्या या थिएटर बाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लावण्यात आला आहे. राजामौली यांनी हा मोठा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले आहे.
ऑस्कर अवॉर्ड्स (Oscar Awards) 2023 च्या आधी, RRR लॉस एंजेलिस, मध्ये पुन्हा रिलीज होणार आहे. येथील एका थिएटरमध्ये काही तासांतच या चित्रपटाची 1600 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. आता संपूर्ण थिएटर हाऊसफुल्ल झाले आहे. याबाबत राजामौली यांनी सांगितले की, लॉस एंजेलिसमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनिंगवर RRR चा जलवा दिसणार आहे. यावेळी चित्रपटाचा मुख्य अभिनेता रामचरण आणि दिग्दर्शक एसएस राजामौली उपस्थित राहणार आहेत.
भारतात तेरा मार्च रोजी प्रेक्षेपित होणा-या ऑस्कर सोहळ्यात (Oscar Awards) तमाम भारतीयांचे लक्ष RRR चित्रपटाकडे लागून राहणार आहे. ऑस्कर पुरस्कार समारंभात RRR च्या नातू-नातू गाण्याचे स्टेज परफॉर्मन्स होणार आहे. या समारंभात गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव हे लाइव्ह करणार आहेत. ऑस्करसारख्या व्यासपीठावर भारतीय गाणे सादर होईल तेव्हा अवघं जग त्यावर ताल धरेल असा विश्वास राजामौली यांनी व्यक्त केला आहे. नातू-नातू गाण्याला ऑस्करसाठी (Oscar Awards) नामांकन मिळाले आहे. नातू-नातू या गाण्याची रिहाना, लेडी गागा, मित्स्की, डेव्हिड बायर्न आणि डायन वॉरन यांच्या गाण्याबरोबर स्पर्धा होणार आहे. या समारंभात नातू नातू सह रिहाना तिच्या लिफ्ट मी अप या गाण्यावरही परफॉर्म करणार आहे. नातू-नातू या गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कारही मिळाला आहे. (Oscar Awards)
ऑस्करपूर्वी हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये (Oscar Awards) RRR ने एकूण 4 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी सर्वोत्कृष्ट अॅक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर, सर्वोत्कृष्ट मूळ गाणे आणि सर्वोत्कृष्ट स्टंट श्रेणींमध्ये मानाचे पुरस्कार जिंकले आहेत. 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेला RRR हा चित्रपट भारतासह जगभरातही खूप गाजला. चित्रपटानं 1200 कोटींहून अधिक गल्ला गोळा केला आहे. अजूनही जगभरात RRR अनेक चित्रपटगृहांमध्ये कमाई करत आहे. जपान आणि अमेरिकेमध्ये हा चित्रपट नव्यानं प्रदर्शित करण्यात आला आहे. अमेरिकेत या चित्रपटाने 110.7 कोटी रुपयांहून अधिक कमाई करून विक्रम केला आहे. यूएईमध्येही या चित्रपटाने 40 कोटींचा व्यवसाय केला आहे. एस.एस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि श्रेया सरन मुख्य भूमिकेत आहेत.
======
हे देखील वाचा : गीता गोविंदमचा पार्ट 2 येणार का?
======
आता ऑस्करच्या अंतिम स्पर्धेपर्यंत (Oscar Awards) RRR गेल्यामुळे जगभरातील चित्रपटाचे चाहते नातू-नातू गाण्यावर नृत्य करीत आहेत. काही दिवसापूर्वी भारतातील कोरियन दूतावासाने सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये कोरियन राजदूत चांग जे बोक आणि दूतावासातील कर्मचारी नातू नातू गाण्यावर नाचत आहेत. 53 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजलाच पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. आता हेच नातू नातू गाणे ऑस्करमध्ये (Oscar Awards) थेट लाईव्ह होणार आहे. या सोहळ्याचा होस्ट म्हणून जिमी किमेल असणार आहे. RRR चा जलवा ऑस्कर सोहळ्यात नक्की चालणार अशी खात्री चित्रपटाच्या सर्व टीमला आहे. सोबतच RRR च्या लाखो चाहत्यांनाही ऑस्कर भारतात येणार अशी खात्री आहे. एकूण 13 मार्चची सर्वांनाच उत्सुकता आहे.