Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

Chhaava Movie : आता तर ‘छावा’चीच धुम, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पडली भूरळ
‘आया आया आया रे तुफान…’ खरंच छत्रपती संभाजी राजांचे शौर्य अगदी योग्य शब्दांत मांडणारे गाण्याचे हे बोल आणि छत्रपती शंभु राजांची कारकिर्द आजच्या तरुण पिढीला सांगणारा चित्रपट ‘छावा’ (Chhava Movie) काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या पहिल्या ऐतिहासिकपटात शंभु राजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने साकारली असं म्हणण्यापेक्षा तो ती भूमिका अक्षरश: जगला आहे. दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक भारतातच नव्हे तर जगभरातही होत असल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाची छाती आज अभिमानाने भरली आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही छावा चित्रपटाची भूरळ पडली असून त्यांनी राजधानी दिल्लीत संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी चित्रपटाचे भरभरून कौतुक करत मराठी भाषेचे देखील गोडवे गायले. (Chhaava Movie)

काय म्हणाले पंतप्रधान?
१९५१ साली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन दिल्लीत झाले होते. आणि त्यानंतर आता २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते संपन्न झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “मराठीचा जेव्हा जेव्हा विषय येतो, तेव्हा मुंबई आणि चित्रपटांचा विषय आल्याशिवाय राहत नाही. मुंबईनेच मराठी आणि हिंदी चित्रपटांना उभारी दिली. आता तर ‘छावा’ची (Chhava Movie) धूम आहे”. शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कांदबरीने करून दिला याची आठवणही त्यांनी करुन दिली. (Bollywood Tadka)
===========
हे देखील वाचा : Chhaava review : कसा आहे विकी कौशलचा ‘छावा’?
===========
‘छावा’ने मोडले बॉक्स ऑफिस रेकॉर्ड
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २४२.२५ कोटींची कमाई केली आहे. अवघ्या ७ दिवसांत हिंदी चित्रपसृष्टीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पहिल्याच चित्रपटाने देशभरात उत्तम कमाई केल्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा बॉलिवूडला सुगीचे दिवस आले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ‘छावा’ (Chhava Movie) या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून अभिनेत्री रश्मिका मंदनाने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेब साकारला आहे. (Box Office Collection)