
Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
संगीतकार रोशन खूप अल्पायुषी ठरले. उण्या पुऱ्या पंधरा-वीस वर्षाच्या काळात त्यांनी पन्नासेक चित्रपटांना संगीत दिले. चित्रपटांची संख्या कमी असली तरी त्यांचं संगीत अप्रतिम असायचं. मेलडीयस असायचे. आज इतक्या वर्षांनंतर देखील रोशन यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी त्यांनी संगीत बध्द केलेल्या कव्वाली रसिक विसरू शकले नाही. ‘ये इश्क इश्क है इश्क इश्क’ ही बरसात की रात सिनेमातील रोशन यांनी स्वरबध्द केलेली कव्वाली आजही हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट पाच कव्वालीत आपले स्थान टिकवून आहे. बावरे नैन, ताजमहल, दिल हि तो है, आरती, चित्रलेखा, ममता, भीगीरात, बहू बेगम… हे त्यांचे सुपरहिट म्युझिकल सिनेमे होते. (Rakesh Roshan)

संगीतकार Roshan यांचे पुत्र राजेश रोशन आणि राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी पुढची काही दशक गाजवली तर आज संगीतकार रोशन यांचे नातू रितिक रोशन हिंदी सिनेमातील आघाडीचे अभिनेते आहेत. मध्यंतरी अभिनेता राकेश रोशन यांनी आपल्या वडिलांची एक भावस्पर्शी आठवण आपल्या कार्यक्रमात सांगितली होती. त्यावेळी Rakesh Roshan यांचे वय दहा ते बारा वर्षे असावे. मुंबईत ज्या एरियात रोशन कुटुंबीय राहत होते त्याच्या कॉलनीत गीतकार शैलेंद्र देखील रहात होते.

एकदा राकेश रोशन घराच्या बाल्कनीमध्ये पतंग उडवत असताना असताना त्यांना खाली शैलेंद्र जाताना दिसले. गीतकार शैलेंद्र यांनी राकेश रोशन यांना विचारले, ”गुड्डू, पापा घर मे है क्या?” त्यावर राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी मान डोलावली. शैलेंद्र यांनी लगेच आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढली. त्याचा गोळा बनवला आणि तो वर बाल्कनीत राकेश रोशन यांच्याकडे फेकला आणि सांगितलं की, ”हा कागद तू तुझ्या वडिलांना दे.” राकेश रोशन यांनी तो कागदाचा गोळा झेलला आणि आत जाऊन आपले वडील रोशन यांना दिला. संगीतकार रोशन यांनी उघडून पाहिले त्यावर काही ओळी लिहिल्या होत्या. ‘बहुत दिया जमाने ने मुझको….’ रोशन यांना त्या ओळी खूप आवडल्या लगेच त्यांनी हार्मोनियम उघडून त्याला चाल लावायला सुरुवात केली. काही वेळाने त्यांनी राकेश रोशन यांना बोलावले आणि सांगितले, ”जर तुला शैलेंद्र अंकल पुन्हा जाताना दिसले त्यांना वर बोलव.”

राकेश रोशन (Rakesh Roshan) यांना काही वेळाने पुन्हा शैलेंद्र रस्त्यावर दिसले त्यांनी त्यांना आवाज देऊन वर बोलावले. नंतर गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार रोशन यांनी त्या गाण्यावर आणखी एक काम करून पुढच्या अर्ध्या तासात गाण्याची चाल फायनल केली! त्या काळात अभिनेत्री नूतन यांचे पती रजनीश बहल एक चित्रपट बनवत होते. चित्रपटाचे नाव ते ‘सूरत और सिरत’. हा चित्रपट संगीत नियोजनासाठी रोशन यांच्याकडे आला. त्यांनी हे गाणे या चित्रपटात वापरायचे ठरवले. चित्रपटात हे गाणे धर्मेंद्रवर चित्रित आहे. हे गाणं मुकेश यांनी त्यांच्या दर्द भऱ्या अतिशय अप्रतिम आवाजात गायले.
चित्रपट चालला नाही पण हे गाणं त्या काळात आणि आज देखील चांगलेच लोकप्रिय आहेत. राकेश रोशन (Rakesh Roshan) यांना तर हे गाणे इतके आवडते की त्यांनी त्यांच्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटातील ‘ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मो का संगम है..’ या गाण्यातील इंटरल्युड याच सुरावटीचे बासरीचे पिसेस आहेत. ‘सूरत और सिरत’ हा चित्रपट त्या काळातील फ्लॉप सिनेमा ठरला. पण त्याची स्टोरी लाईन चांगली होती. नूतनचा अभिनय चांगला होता. अभिनेता धर्मेंद्रने रंगवलेला संवेदशील प्रियकर चांगला होता. त्याने यांनी साईन केलेला हा दुसराच चित्रपट होता.
============
हे देखील वाचा : Dil Se.. : सिनेमातील सतरंगी रे… गाणे बनले कसे?
============
नूतन यांचे पती डॉक्टर रजनीश बहन यांनी दिग्दर्शित केलेला हा एकमेव चित्रपट होता. गंमत म्हणजे धर्मेंद्र यांची नायिका म्हणून नूतन यांनी बंदिनी, सूरत और सिरत, दुल्हन एक रात की, दिल ने फिर याद किया… या सिनेमात भूमिका केल्या. पण १९८७ साली ‘सोने पे सुहागा‘ या चित्रपटात नूतन यांनी चक्क धर्मेंद्रच्या आईची भूमिका केली होती! (Bollywood mix masala)