‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Rekha : ‘उमराव जान’ ४४ वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘या’ दिवशी होणार री-रिलीज!
Umrao Jaan: बॉलिवूडमधील एक अविस्मरणीय आणि सौंदर्यपूर्ण चित्रपट ‘उमराव जान’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेखा यांच्या करियरमधील एक अत्यंत प्रतिष्ठित भूमिका असलेला हा सिनेमा २७ जून रोजी देशभरात पुन्हा थिएटर्समध्ये प्रदर्शित होतो आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला आणि मुजफ्फर अलीदिग्दर्शित हा सिनेमा आता नवीन 4K क्वालिटीमध्ये पुन्हा अनुभवता येणार आहे. ‘उमराव जान’ ही एक तवायफची कथा आहे, जी प्रेम, फसवणूक आणि मोह अशा भावना अत्यंत सूक्ष्मतेने सादर करते. (Umrao Jaan Re-release)

मुजफ्फर अली यांनी या चित्रपटातून केवळ एका स्त्रीची कथा सांगितली नाही, तर तिच्या सौंदर्य, संघर्ष, संस्कृती आणि अस्तित्वाला पडद्यावर जगवले. याबद्दल अली म्हणतात की, “उमराव जान ही तीन पिढ्यांनी आपलंसं केलेली एक कलाकृती आहे. ती आपल्या काळाच्या पुढची गोष्ट सांगणारी कलाकृती होती.”दिग्दर्शक अली यांच्यामते, या चित्रपटात जे “जुनून, संवेदनशीलता आणि कलात्मक बारकावे” दाखवले गेले आहेत, तेच याला खास बनवतात. रेखा यांनी साकारलेली उमराव जान ही केवळ एक पात्र नव्हते, तर ती महिलांची ओळख बनली. ही भूमिका इतकी प्रभावी ठरली की आजही अनेक प्रेक्षक ती पाहताना स्वतःचे भावनिक क्षण आठवतात.
==================================
हे देखील वाचा: ‘एक… दो… तीन’ ते मोहिनी पर्यंतचा प्रवास: Madhuri Dixit च्या स्टारडमचा खास किस्सा!
==================================
या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान अनेक अडचणी आल्या. बजेट अभावी तो एकदा थांबण्याच्या मार्गावर होता. मात्र लखनऊच्या नवाब घराण्यांनी पुढे येऊन त्यांच्या तिजोर्या उघडल्या आणि शूटिंगसाठी त्यांच्या ऐतिहासिक हवेल्या आणि वास्तूंना उपलब्ध करून दिलं. त्यामुळे सिनेमाला एक समृद्ध पार्श्वभूमी मिळाली आणि दृश्यं अधिक मोहक बनली.

या री-रिलीजच्या निमित्ताने एक विशेष कॉफी टेबल बुक देखील लाँच करण्यात आली आहे. या बुकमध्ये ‘उमराव जान’च्या निर्मितीमागील कधी ही न ऐकलेल्यागोष्टी , दुर्मीळ फोटो, कॉस्ट्यूम डिझाइन्सचे स्केचेस, शायरी, सुंदर कॅलिग्राफी आणि सेटवरील खास आठवणींना स्थान देण्यात आलं आहे. (Umrao Jaan Re-release)
==================================
हे देखील वाचा: Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि पारंपारिक उपाय!
==================================
रेखा यांनी या पुनःप्रदर्शनावर आपली भावना व्यक्त करत म्हटलं की, ‘उमराव जान’ ही एक फिल्म नाही, ती माझ्या आतमध्ये आजही जिवंत आहे. तिचं मोठ्या पडद्यावर पुन्हा येणं म्हणजे जणू जुनं प्रेमपत्र नवीन पिढीनं उघडल्यासारखं आहे. माझं मन भरून आलं आहे.’त्यामुळे १९८१ मध्ये प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलेली ‘उमराव जान’ आता नव्या स्वरूपात पुन्हा एकदा जादू निर्माण करायला तयार आहे. २७ जूनपासून देशभरातील PVR Inox थिएटर्समध्ये ही क्लासिक कलाकृती अनुभवता येणार आहे. रेखा यांच्या अभिनयाची गोडी, मुजफ्फर अलींचं दिग्दर्शन आणि लखनवी नवाबशाही वातावरण पुन्हा एकदा खऱ्या अर्थी जिवंत होणार आहे.