‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Vicky Kaushal : ‘छावा’नंतर विकीची यशराजच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री?
‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपटाने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांना विशेष ओळख दिली असंच म्हणावं लागेल. आजवर विकी कौशलने साकारलेल्या भूमिकांपेक्षा छत्रपती संभाजी महाराज ही भूमिका प्रेक्षकांना कायमस्वरुपी लक्षात राहिली आहे. ऐतिहासिक चित्रपट सुपरहिट दिल्यानंतर लवकरच विकी कौशल यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री करणार असं सांगितलं जात आहे. काय आहे नेमकं प्रकरण? (Yashraj Film And Spy Universe)

तर, सध्या यशराज फिल्म्सचं स्पाय युनिवर्स आणि मॅडॉक फिल्म्सचं हॉरर-कॉमेडी जग प्रेक्षकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. ‘जवान’, ‘पठाण’, ‘वॉर’, ‘एक था टायगर’ असे सुपरहिट रॉ एजंट्स चित्रपटसृष्टीत इंट्रोड्यूस केल्यानंतर आता लवकरच विकी कौशलच्या रुपात आणखी एक रॉ एजंट यशराज आणणार अशा चर्चा रंगल्या आहेत.(Bollywood news)

‘मिड डे’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून विकी कौशल आणि यशराज यांच्यात या स्पाय युनिवर्सबद्दल चर्चा सुरु आहे. विकी या फ्रेंचायझीचा भाग होण्यासाठी फार उत्सुक असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान, विशेष म्हणजे विकीची पत्नी कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांच्याच ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger Movie) या चित्रपटापासून यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्सची सुरुवात झाली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच यशराज विकी कौशलला घेऊन त्यांच्या स्पाय युनिर्समधील नवं पात्र आणि कथा घोषित करतील याची वाट सगळेच पाहात आहेत. (Bollywood classic movies)
================================
हे देखील वाचा: Sanjay Leela Bhansali : ‘लव्ह अॅण्ड वॉर’मध्ये रणबीर-विकीची काटें की टक्कर!
=================================
दरम्यान, विकी कौशलच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ‘महावतार’ (Mahavatar Movie) या चित्रपटात देव परशुराम साकारणार आहे; त्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अॅंड वॉर’ (Love And War) चित्रपटात विकी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (ALia Bhatt) सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच, स्पाय युनिवर्समधील ‘वॉर २’ (War 2 Movie) चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज होणार असून या चित्रपटातून ज्युनिअर एन.टी.आप बॉलिवूमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच, यशराज आलिया भट्ट आि शर्वरी वाघ यांना घेऊन फिमेल स्पाय चित्रपट ‘अल्फा’ (Alpha Movie) लकरच भेटीला आणणार आहेत. (Entertainment)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi