Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं
‘या’ गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी Mohammad Rafi यांना रडू कोसळले होते!
हिंदी सिनेमातील काही गाणी आयकॉनिक असतात. गेली पन्नास-साठ वर्षे भारतात विवाह प्रसंगी बिदाईच्या वेळी एक गाणे हमखास वाजवले जाते आणि हे गाणे ऐकून प्रत्येक जण आतून हळहळतो, त्यांचे डोळे आसवांनी भरून येतात! हे गाणं गीतकार साहीर लुधियानवी यांनी लिहिलं होतं तर त्याला संगीत रवी यांनी दिलं होतं. १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘नीलकमल’ या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेले हे गाणे होते ‘बाबुल की दुवाये लेती जा जा तुझको सुखी संसार मिले..’ विवाह मंडपात वधू पिता आणि माता एकाच वेळी आनंद आणि दु:ख या भावनांनी ओतप्रोत असतात. आपली मुलगी चांगल्या घरी जात आहे याचा आनंद तर तिचा सहवास आता दुरावणार याचे दु:ख . या प्रसंगा वरील हे गाणे आज पन्नास वर्ष उलटून गेली तर अजरामर आहे.
‘नीलकमल ‘ या चित्रपटात राजकुमार वहिदा रहमान आणि मनोज कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम महेश्वरी यांनी केले होते. या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा भन्नाट आहे. संगीतकार रवी यांनी शिवरंजनी या रागावर हे गाणं बसवलं होतं ही ट्यून त्यानी साहीर यांच्याकडे दिली. साहिरने अतिशय भावस्पर्शी शब्दांमध्ये हे गाणं लिहिलं. कोणत्याही वधू पित्याच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा उभे करण्याचे सामर्थ्य या गीतात होते. या गाण्याच्या रेकॉर्डिंग ला जेव्हा मोहम्मद रफी आले आणि त्यांनी रिहर्सल केली. रफी अतिशय संवेदनशील कलावंत. ते गाणे वाचून हमसून हमसून रडू लागले. संगीतकार रवी यांनी त्यांना समजावलं. रफी यांचे मेव्हणे जफरभाई तिथेच होते. त्यांना विचारलं तेंव्हा त्यांनी असं सांगितलं की,” मागच्या आठवड्यातच रफी यांच्या मुलीची एंगेजमेंट झाली आहे लवकरच तिचा निकाह होणार आहे. त्यामुळे रफी यांनी भावना विवश होणे साहजिक आहे.”

रेकॉर्डिंग झाल्यानंतर काही दिवसातच गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मुलीचे लग्न होते. या लग्नात राजेंद्र कृष्ण यांनी संगीतकार रवी यांना बोलावले होते आणि त्यांना एक गाण्याची फर्माईश देखील केली होती. तेव्हा संगीतकार रवी यांच्या असं लक्षात आलं की काही दिवसापूर्वीच आपण बिदाई गीत रेकॉर्ड केलेलं आहे. रवी हे स्वतः चांगले गायक देखील होते. त्यांनी गीतकार राजेंद्र कृष्ण यांना सांगितले,” मी लग्नात नक्की गाणं जाईल पण बिदाई च्या वेळी!” राजेंद्र कृष्ण यांच्या मुलीचे लग्न लागले. या लग्नाला साऊथ कडील आणि बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती होती. बिदाईच्या वेळी संगीतकार रवि यांनी माईक हातात घेतला आणि गायला सुरुवात केली..’ बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले मैके की कभी ना याद आये ससुराल मे इतना प्यार मिले..’ हे गाणं ऐकल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहून लागल्या.

राजेंद्र कृष्ण यांची मुलगी तर वडीलांच्या कुशीत जाऊन धाय मोकलून रडू लागली. एकूणच या गाण्याचा इम्पॅक्ट जबरदस्त होता. सिनेमा रिलीज च्या पूर्वीच या गाण्याने सर्वांची मने जिंकली होती. लग्न मंडपातील सर्वांनी संगीतकार रवी यांना विचारले की,” हे कोणते गाणे आहे? कोणत्या चित्रपटासाठी तुम्ही रेकॉर्ड केले आहे?” तेव्हा रवी यांनी सांगितलं,” लवकरच तुम्हाला कळेल!” २१ सप्टेंबर १९६८ रोजी ‘नील कमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाला चांगले यश मिळाले. 1968 सालच्या टॉप थ्री सिनेमा मध्ये ‘नीलकमल’ होता.
================================
हे देखील वाचा : Rajesh Khanna यांनी ‘आराधना’त काम करायला का नकार दिला होता?
================================
पहिल्या क्रमांकावर ‘आंखे’ दुसऱ्या क्रमांकावर ‘पडोसन’ तर तिसर्या क्रमांकावर ‘नीलकमल’ होता. गुलशन नंदा यांच्या कादंबरीवरील या चित्रपटाची पटकथा किदार शर्मा यांनी लिहिली होती. नीलकमल या चित्रपटाला त्यावर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये तब्बल आठ नामांकन मिळाली होती सर्वोत्कृष्ट नायिका (वहिदा रहमान) सर्वोत्कृष्ट कथा (गुलशन नंदा) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (राजकुमार) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (शशीकला) सर्वोत्कृष्ट विनोद वीर (मेहमूद) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (राम माहेश्वरी) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (मोहम्मद रफी- बाबुल की दुवाये लेती जा) पुरस्कार मात्र केवळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा वहिदा रहमान यांना मिळाला.