‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
चांदनी चौक १९५४
निर्मिती : हिरा फिल्म्स
निर्देशक : बी.आर.चोप्रा
गीतकार : मजकह सुल्तानपुरी, शैलेंद्र सैफ, कामिल रशीद, राजा मेहंदी अली खान
कलाकार : मीनाकुमारी, शेखर, स्मृती विश्वास, जीवन, बेबी नाझ, सुंदर, मनमोहन कृष्ण, यशोधरा काटजू
लाहोर मध्ये रहात असताना मुस्लिम समाज त्यांनी फार जवळून पहिला होता. ‘चांदनी चौक’ हा चोप्रांनी निर्देशित केलेला पहिला मुस्लिम सोशल चित्रपट होता. जुने वैभव लयाला गेले तरी त्या परंपरा, रूढी जपणारा नवाब, तेथील खानदानी, सनातनी वातावरण, तिथे घडणारे नाट्य याचे सुरेख चित्रण चोप्रांच्या चांदनी चौक मध्ये पहायला मिळते.
शहरातला रईस एके काळचा सब्जीवाला इब्राहिम बेग(जीवन) आपला बीटा युसूफ यासाठी (आगा) नवाब सफदर जंग (कुमार) कडे ह्याच्या बेटीचा झरिनाचा (मीनाकुमारी) हात मागतो. नवाब सब्जीवाल्याचा खानदानात आपल्या बेटीचा रिश्ता जुळविण्यास स्पष्ट नकार देतो. या अपमानाने चिडून बेग (जीवन) कुटील कारस्थान रचतो. नवाबला फसवून झरीनाला एका गरीब माळ्याच्या मुलाशी अकबरशी (शेखर) निकाह करण्यास भाग पाडतो. गरीब असला तरी झरीनाला अकबर आवडतो.
हे ही वाचा : शोले (१९५३) प्रेम आणि प्रत्यक्ष वैवाहिक आयुष्य या दोघात सांगड घालणे किती कठीण असते, हे समजावणारा चित्रपट!
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवाब सफदरजंग संतापतो व चिडून जावयाला अकबरला घरातून हाकलवून देतो. झरीना खूप दुःखी होते, पण काही करू शकत नाही. अकबर कैरोला जातो, तिथे धंदा करतो. त्याच्या जीवनात एक नर्तिका (स्मृती बिश्वास) येते. इथे झरीना आपल्या शोहरची प्रतीक्षा करत असते. पुढे त्या नर्तिकेचा मृत्यू होऊन झरीना व अकबरचे मिलन होते. रोशन चे संगीत आणि मीनाकुमारीचा लाजवाब अभिनय यामुळे चित्रपट कायम स्मरणात रहातो. दिल्लीत या चित्रपटाने सिल्व्हर ज्युबिली साजरी केली.