MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

Prema Sakhardande यांचं निधन; अक्षयच्या सिनेमात केलेली ‘स्पेशल’ भूमिका
मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे Prema Sakhardande यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी ६ मार्च २०२५ रोजी निधन झालं. माहिमला त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर रात्री उशिरा दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेमा साखरदंडे यांनी मालिका, जाहिरात आणि चित्रपटांमध्ये कामं केली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. (Marathi actress death)
प्रेमा साखरदांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे (Sulabha Deshpande) यांच्यात एक खास नातं होतं. सुलभा देशपांडे आणि प्रेमा या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. ध्वनीमुद्रक वसंतराव कामरेकर यांची मुलगी असलेल्या प्रेमा (Prema Sakhardande) यांना दहा भावंडं होती. बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते या अभिनय क्षेत्रात होत्या. तर भाऊ बापू, अशोक विश्वनाथ, मुकुंद यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दुरचवाणीत काम केलं होतं. शिवाय बहिण कुमुद या गायिका असून त्यांनी परदेशातही गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. (Marathi films)

प्रेमा साखरदांडे (Prema Sakhardande) या अभिनेत्री तर होत्याच पण गेले अनेक वर्ष त्या मुंबईतील शारदा सदन या शाळेत मुख्याध्यापिका देखील होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तकही लिहिले होते. प्रेमा यांनी Akshay Kumar च्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटात विशेष भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. याशिवाय द इम्पॉसिबल मर्डर, सावित्री बानो, आजी तेंडुलकर, बेट, फुल ३ धमाल अशा अनेक चित्रपटात कामं केली होती.
============
हे देखील वाचा :Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
============
अक्षय कुमारलाही ‘त्या’ सीनमध्ये मागे टाकलं
प्रेमा साखरदांडे यांनी अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात अक्षय कुमारच्या प्रेयसीच्या भूमिकेत काम काजल अग्रवाल (Kajal Agrawal) होती. तिच्या आजीची भूमिका प्रेमा साखरदांडेंनी साकारली होती. यात एक सीन होता जिथे प्रियाचं (काजल अग्रवाल) लग्न ठरलं असतं. हे सगळं सुरु असताना आजी पूजा करत असते. त्याचवेळी प्रिया आजीच्या पाया पडून अक्षय कुमारसोबत घर सोडून जायला निघते. या संपूर्ण सीनमध्ये प्रेमा यांच्या तोंडी एकही संवाद नव्हता त्या फक्त मराठी क्ष्लोक म्हणत देवाची पूजा करत घंटी वाजवत होत्या. अक्षय कुमारसोबतचा हा सीन प्रेक्षकांना आजही लक्षात आहे. संवाद नसूनही आपलं काम अधोरेखित कसं केलं जावं याचं हे उत्तम उदाहरण आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. (Prema Sakhardande death)
