Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Madhubala फ्रँक काप्रा यांच्या हॉलीवूड मूव्हीमध्ये दिसली असती?

 Madhubala फ्रँक काप्रा यांच्या हॉलीवूड मूव्हीमध्ये दिसली असती?
बात पुरानी बडी सुहानी

Madhubala फ्रँक काप्रा यांच्या हॉलीवूड मूव्हीमध्ये दिसली असती?

by धनंजय कुलकर्णी 10/06/2025

पन्नासच्या दशकातील भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मधील सर्वात सुंदर अभिनेत्री मधुबाला! तिचे चाहते आपल्या देशात सर्वत्र तर होतेच पण तिच्या सौंदर्याची भुरळ जगभरातील रसिकांमध्ये होती.अर्थात त्या काळी आजच्या सारखा डिजिटल मिडीया नव्हता. सिने मासिकांच्या माध्यमातून च कलाकारांचे फोटो झळकत असत. हॉलीवूडचे ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक फ्रॅंक कापरा हे देखील तिच्या सौंदर्याने मोहित झाले होते. ते मधुबालाला हॉलीवुड मध्ये इंट्रोड्युस करण्यास तयार होते. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न देखील केले. मग असे काय घडले की मधुबाला आणि फ्रॅंक कापरा यांची भेटच होऊ शकली नाही? कोण जबाबदार होते या घटनेला?  खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. (Bollywood news)

भारतीय स्वातंत्र्यानंतर १९५१  साली  देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन नभोवाणी आणि प्रसारण मंत्री आर आर दिवाकर यांना भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात यावा असे सांगितले. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते.सर्व देशवासियांच्या मनात नवी स्वप्ने होती. नव्या आकांक्षा होत्या. सिनेमा या माध्यमावर भारतीयांची पकड होतीच पण जागतिक सिनेमाच्या तुलनेत आपला सिनेमा कुठे आहे? याची देखील उत्सुकता होती. या साठीच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधानाच्या आदेशानुसार पहिल्या फिल्म फेस्टिवलचे काम सुरु झाले.  (Untold Stories Of Bollywood)

==============

हे देखील वाचा : Madhubala : दिलीप कुमार – मधुबालाची अधुरी प्रेमकहाणी!

==============

१९५२ मध्ये भारतात पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (IFFFI) देशातील चार  शहरांमध्ये आयोजित केला गेला. तेवीस देशातील चाळीस फिचर फिल्म या महोत्सवात दाखवल्या गेल्या.  या कार्यक्रमासाठी हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक कापरा यांना देखील खास आमंत्रित केलं होतं. फ्रँक कापरा हे हॉलीवुड मधील फार मोठं नाव होतं. त्यांच्या नावावर अनेक लोकप्रिय चित्रपट आणि पुरस्कार होते. फ्रँक काप्रा जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांच जोरदार स्वागत करण्यात आला. त्यांच्यासाठी आयोजित प्रेस कॉन्फरन्सची जबाबदारी बी के करंजिया यांच्यावर होती. जेव्हा बी के करंजिया फ्रँक काप्रा यांना भेटायला गेले. तेव्हा त्यांच्या हातामध्ये ‘मूवी टाइम’ या मासिकाचा अंक होता. त्या अंकावर मधुबालाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. (Entertainment)

करंजीया आणि फ्रँक काप्रा  यांच्या मीटिंगच्या दरम्यान फ्रँक काप्रा  यांचे लक्ष वारंवार त्या मॅक्झिन कडे चालले होते. शेवटी त्यांनी ते मॅक्झिन हातात घेऊन करंजिया  यांना विचारले “ Who is this gorgeous lady? मला या सुंदर मुलीला आता भेटायचे आहे.” जेंव्हा करंजिया यांनी मधुबाला च्या सिनेमांबद्दल सांगितले तेंव्हा काप्रा म्हणाले “ wow, its good. मी  तिला हॉलीवुड मध्ये इंट्रोड्युस करू इच्छितो.”  बी के करंजिया फ्रँक कापरा यांचे बोल ऐकून खूष झाले. त्यांनी ताबडतोब या दोघांची मीटिंग फिक्स करायचे ठरवले.

त्या पद्धतीने कुलाब्याच्या  ताज हॉटेलमध्ये फ्रॅंक कापरा आणि मधुबाला यांचे लंच अरेंज केले गेले. जेव्हा यांनी या लंच बाबत इन्व्हाईट करण्यासाठी मधुबालाचे वडील अताऊल्ला खान यांना फोन केला तेव्हा त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. करंजिया  यांनी त्यांना हर तऱ्हेने समजावून सांगितले की ” फ्रँक काप्रा  हे जगातील सिनेमाच्या दुनियेतील फार मोठे नाव आहे. ते मधुबालाला हॉलीवुड मध्ये इंट्रोड्युस करू इच्छितात.” परंतु या बोलण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. आणि अगदी  फालतू कारण देऊन त्यांनी ही मीटिंग कॅन्सल केली. त्यांनी करंजिया  यांना सांगितले की ,”आम्ही ताज हॉटेलमध्ये यासाठी येऊ शकत नाही की मधुबाला काटा चमचा आणि सुरीने पदार्थ खाऊ शकत नाही!” (Bollywood Tadaka)

================================

हे देखील वाचा: Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!

=================================

करंजिया यांचा नाईलाज झाला त्यांनी मीटिंग कॅन्सल केली. फ्रँक कापरा यांना देखील खूप आश्चर्य आणि वाईट देखील वाटले. जगभरातील सिने करावंत त्यांच्या मागे सिनेमात भूमिका मिळावी म्हणून धावत असताना भारतात त्यांना असा विचित्र अनुभव आला. अताउल्ला खान यांनी मिटिंग ला नकार दिला नसता तर कदाचित मधुबाला हॉलीवूडच्या सिनेमात आपल्याला दिसली असती. मधुबाला हीची भेट न घेताच ते अमेरिकेला निघून गेले पण जाताना ते तो मूवी टाइम चा अंक सोबत घेऊन गेले ज्यावर मधुबालाचा फोटो प्रसिद्ध झाला होता! (Bollywood Masala)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress madhubala Bollywood Bollywood Actress Bollywood Chitchat Bollywood News bollywood queen madhubala bollywood update Celebrity Celebrity News entertainment tadaka Hollywood Movies Madhubala
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.