ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘घर आया मेरा परदेसी….’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भन्नाट किस्सा!
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत मुंबईचा पाऊस पहिल्यापासूनच असाच घनघोर आहे. आपल्या हिंदी सिनेमांमध्ये मुंबईचा पाऊस आपल्याला बऱ्याचदा पडद्यावर दिसतो पण याच मुंबईच्या पावसाने एकदा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगला जमलेल्या सर्व कलावंतांना चक्क स्टुडिओमध्ये मुक्काम करायला लावला होता. हे सर्व गायक,वादक आणि संगीतकार कलावंत रात्रभर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अडकून पडले होते. (Rajkapoor)
पण या परिस्थितीचा फायदा निर्माता दिग्दर्शकाने वेगळ्या पद्धतीने करून घेतला आणि जे गाणं दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग करायचं होतं ते त्या रात्रीच रेकॉर्ड करून टाकलं! आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचे तर संकटाचे संधी रुपांतर करून टाकले! हे गाणं तुम्ही आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. त्याच्याच रेकोर्डिंगचा हा भन्नाट किस्सा. (Rajkapoor)
हा किस्सा आहे आर के फिल्म्सच्या ‘आवारा’ या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा. हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं आणि आज ७० वर्षानंतरसुद्धा ते तितकंच लोकप्रिय आहे. वस्तुतः हे गाणं दोन गाणी मिळून तयार झालं होतं. या गाण्याच्या पहिल्या भागामध्ये मन्ना डे आणि लताचा स्वर होता. ‘तेरे बिना आग ये चांदनी तू आजा…’ हे ते गाणं होतं. तर दुसऱ्या भागामध्ये ‘घर आया मेरा परदेसी प्यास बुझी मेरी अन्खीयन की….’ हे गाणं होतं. चित्रपटात ही दोन्ही गाणी बॅक टू बॅक अर्थात एका पाठोपाठ येतात. (Rajkapoor)
या गाण्यात संगीतकार शंकर जयकिशन यांनी वादकांचा फार मोठा ताफा वापरला जवळपास शंभर-दीडशे वादक या गाण्यासाठी वापरले होते. यासाठी पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता गाण्याची रिहर्सल सुरू झाली. दुपारनंतर आकाशात काळे मेघ दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत सगळी मुंबई पावसाने पार धुवून निघाली. शिवाय रस्ते, लोकल ट्रेन सर्वच जागच्याजागी ठप्प झाले. सर्व वादक, गायक कलाकार, संगीतकार, गीतकार, स्वतः राज कपूर (Rajkapoor) आणि त्यांचे साथीदार स्टुडिओमध्ये आले होते.
यावेळी पहिल्या गाण्याचे रेकॉर्डिंग संध्याकाळपर्यंत संपले. पण असे ठरले होते कि या गाण्याचा पहिला भाग ‘तेरे बिना आग ये चांदनी तू आजा…’ आदल्या दिवशी रेकॉर्ड करायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसरा भाग. पण बाहेर पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की कुणालाच बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे राज कपूरने (Rajkapoor) सर्वांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था तिथे केली. (Rajkapoor)
त्यानंतर रात्री सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यावेळी राज कपूरच्या (Rajkapoor) डोक्यात एक कल्पना आली. त्याने सर्वांना बोलावले आणि विचारले, “आपण सर्व जण इथे अडकून पडलो आहोत. मुसळधार पावसाने कुणालाच रात्री घरी जाता येणार नाही. तेंव्हा या गाण्याच्या दुसऱ्या भागाचं रेकॉर्डिंग आत्ताच रात्री उरकून टाकलं तर?” सर्वांनी एक मुखाने “हो..चालेल” म्हटले. आणि पुन्हा एकदा रात्री दहा वाजता रिहर्सलचा फेरा सुरू झाला. (Rajkapoor)
आता लता मंगेशकर आणि कोरस यांच्या स्वरात ‘घर आया मेरा परदेशी…’ या गाण्याचे रेकॉर्डिंग होते. सर्व कलाकार उत्साहाने गात होते. बाहेरच्या पावसाने मन प्रसन्न झाले होते. अशा रीतीने पहाटे पाच वाजता सर्व रेकॉर्डिंग संपलं. सर्वांसाठी पुन्हा एकदा चहा नाश्त्याची सोय केली गेली. रात्रभर जागून राज कपूर (Rajkapoor) आणि त्याच्या टीमने एका पाठोपाठ एक अशी दोन गाणी सलग रेकॉर्ड केली. (Rajkapoor)
खरंतर ही दोन गाणी दोन वेगवेगळ्या दिवशी रेकॉर्ड करायची होती पण पावसामुळे ही गाणी एकाच दिवशी रेकॉर्ड झाली. संकटाचे संधीमध्ये रूपांतर कसे करायचे ते या उदाहरणावरून सिद्ध होते! शैलेन्द्र यांनी हे गीत लिहिले होते. हे गाणे राज कपूर (Rajkapoor) यांनी खूप कल्पकतेने जसे रेकॉर्ड करवून घेतले तसेच त्याचे चित्रीकरण देखील केले.
==========
हे देखील वाचा : ‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमावेळी किशोर कुमार का चिडला होता ?
==========
माझ्या मते हे भारतीय सिनेमातील पहिले सुपरहिट ड्रीम साँग आहे. या सिनेमात राज-नर्गीस यांची केमिस्ट्री मस्त जुळून आली होती. राज कपूर (Rajkapoor) झपाटलेला कलाकार होता. त्याचे हे झपाटलेपण सिनेमाच्या प्रत्येक घटकात दिसते. ‘आवारा’ या सिनेमाने जगभर मोठी लोकप्रियता हासील केली. विशेषतः रशियामध्ये या सिनेमाने जबरदस्त बिझनेस केला. (Rajkapoor)