Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bahubali : The Epicने बॉक्स ऑफिसवर घातला राडा! Re-Release मध्ये मागे टाकलं ‘Interstellar’ ला
एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपट ही केवळ एक फ्रेंचायझीनसून तो एक अनुभव आहे… एका वेगळ्याच जगात प्रेक्षकांना घेऊन जाणाऱ्या या चित्रपटाचे दोन भाग ‘बाहुबली : द बिगनिंग’ (Bahubali : The Begnning) आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ (Bahubali : The Conclusion) हे सुपरहिट ठरलेच… आणि आता या दोन्ही चित्रपटांना एकत्रित करत रि-एडिटेच ‘बाहुबली : द एपिक’ (Bahubali : The Epic) हा चित्रपट रिलीज झाला असून ४ दिवसांमध्ये चित्रपटाने २० कोटींचा टप्पा पार केला आहे… जाणून घेऊयात चित्रपटाच्या कमाईबद्दल… (Entertainment News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘बाहुबली : द एपिक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ७.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६.३ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण २४.६९ कोटींची कमाई केली आहे… दरम्यान, मुळ तमिळ आणि तेलुगु भाषेतील या चित्रपटाने जगभरात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला अग्रस्थान मिळवून दिलं असून हजारो कोटींच्या घरात कमाई केली आहे… अभिमानाची बाब म्हणजे राजामौलींच्या या चित्रपटाने रि-रिलीजमध्ये Christopher Nolan च्या Interstellar चित्रपटालाही मागे टाकत जगातील Biggest Re-Release चित्रपट ठरला आहे… (Bahubali : The Epic box office collection)

‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या चित्रपटात प्रभास (Prabhas), राणा दग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, सत्यराज, नसीर आणि बऱ्याच दाक्षिणात्य कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत… दरम्यान, राजामौली यांनी त्यांच्या बऱ्याच चित्रपटांमधून रेकॉर्ड निर्माण केले आहेत… पहिल्यांदाच भारतीय चित्रपटसृष्टीत दोन चित्रपटांचां एकत्रिकरण करुन एक भव्य चित्रपट राजामौलींनी तयार केला आहे… शिवाय लवकरच ‘बाहुबली : द इटर्नल वॉर’ (Bahubali : The Eternal War) हा चित्रपटही राजामौली घेऊन येणार असून हा बाहुबलीचा तिसरा भाग नसून बाहुबली युनिवर्समधील एक चित्रपट असणार आहे…
================================
हे देखील वाचा : SSMB29 : राजामौलींच्या १००० कोटींचं बजेट चित्रपटाचा’बाहुबली’पेक्षाही भव्यसेट!
================================
दरम्यान, राजामौलींच्या आगामी चित्रपटाबदद्ल बोलायचं झालं तर, लवकरच ते १००० कोटींचं बजेट असणारा SSMB29 हा चित्रपट घेऊन येत आहेत… यात महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिकेत असून १५ वर्षांपेक्षा अधिक काळानंतर बऱ्याच प्रियांका साऊथ चित्रपटात काम करताना दिसणार आहे… (SS Rajamouli’s Movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi