Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Chhaava : ४०० कोटींचा आकडा पार करणारा यंदाचा पहिला चित्रपट

 Chhaava : ४०० कोटींचा आकडा पार करणारा यंदाचा पहिला चित्रपट
chhaava
बॉक्स ऑफिस

Chhaava : ४०० कोटींचा आकडा पार करणारा यंदाचा पहिला चित्रपट

by रसिका शिंदे-पॉल 01/03/2025

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने २०२५ या वर्षात बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम केला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे वेगवेगळे पैलु दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असून याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार करत एक नवा इतिहास रचला आहे. जाणून घेऊयात ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर १५ व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला. (Chhaava)

चित्रपटगृहातून सध्या एकच गर्जना ऐकू येतेय ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो… सर्वच वयोगटातील प्रेक्षक ‘छावा’ (Chhaava Box Office Collection) चित्रपट संपल्यानंतर डोळ्यांमध्ये अश्रू घेऊनच बाहेर पडताना दिसत आहेत. पण बॉक्स ऑफिसचा निकाल पाहता आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा चित्रपट इतकी मोठी कामगिरी करत असल्याचा अभिमान देणारा क्षण आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार ‘छावा’ ने १५ व्या दिवशी उत्तम कमाई केली आहे. (Bollywood update)

Vicky Kaushal च्या ‘छावा’ने ११ व्या दिवशी चित्रपटाने १८ कोटी, १२ व्या दिवशी १८.५ कोटी, १३ व्या दिवशी २३ कोटी, १४ व्या दिवशी १३.२५ कोटी, १५ व्या दिवशी १३.४२ कोटींची कमाई करत आत्तापर्यंत एकूण ४१२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. २०२५ या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ‘इमर्जन्सी’, ‘आझाद’, ‘मेरे हसबंड की बीवी’, ‘फतेह’, ‘देवा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. पण या सगळ्यांना मागे टाकत ‘छावा’ने ४०० कोटींचा टप्पा पार करत पहिलं स्थान पटकावलंय. (Chhaava box office collection 2025)

============

हे देखील वाचा :  Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?

============

‘छावा’ या चित्रपटातून खरं तर केवळ छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमच नाही तर वैयक्तिक जीवनात ते कसे होते? हिंदु धर्मा प्रती त्यांची आस्था काय होती? ते माणूस म्हणून कसे होते असे वेगवेगळे पैलु उलगडण्याचा प्रयत्न दिसून येतो. शिवाय, २१व्या शतकातील आजच्या तरुण पिढीला हॉलिवूडमध्ये सुपरहिरो खरे हिरो वाटतात; त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या या रिअल हिरोबद्दलची माहिती सांगणारा छावा चित्रपट नक्कीच आहे आणि एक उत्तम कलाकृती आहे यात शंकाच नाही. (Chhatrapati Sambhaji Maharaj)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Box Office box office collection Celebrity Chhaava Chhatrapati sambhaji maharaj chhatrapati shivaji maharaj divya dutta Entertainment Laxman Utekar rashmika mandana Santosh Juvekar trending news Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.