Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Deepika Padukone : “कलाकाराला नाही म्हणता आलं पाहिजे”; पंकज यांचा दीपिकाला पाठिंबा
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला होता. अभिनेत्रीने काम करण्याच्या तासांबद्दल आणि मानधनाबद्दल अधिक मागणी केल्याचं सांगत तिला चित्रपटातून मागे हटवण्यात आलं असल्याचं कारण समोर आलं. त्यानंतर काही दिवसांनी एका मुलाखतमीध्ये दीपिकाने ‘स्पिरिट’ चित्रपटाचा किंवा दिग्दर्शकाच्या नावाचा उल्लेख न करता कलाकारांच्या कामाच्या तासांबद्दल वक्तव्य करत १६-१८ तासांऐवजी ८ तास असावं असा आग्रह धरला होता. आता तिच्या या विधानावर अभिवनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी देखील समर्थन दाखवले आहे.(Bollywood tadaka)

सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ (Criminal Justice 4) या वेब सीरीजमुळे विशेष चर्चेत आहेत. याशिवाय ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) मधून परेश रावल यांनी काढता पाय घेतल्यानंतर आता बाबूराव ही भूमिका पंकज करणार अशाची चर्चा सुरु झाल्या होत्या. एकीकडे हा सावळा गोंधळ चालू असताना आता पंकज त्रिपाठी यांनी कलाकारांच्या कामांच्या तासाबद्दल विधान केलं आहे. पंकज म्हणाले की, “कलाकार कोणत्याही कामासाठी नकार देत नाही. पण, त्यांना नाही म्हणता आलं पाहिजे. प्रत्येकाला माहित असले पाहिजे की आपली सीमारेषा काय आहे आणि ती आखता आली पाहिजे. त्यापलीकडे काही नाही.”(Entertainment latest news)

पुढे पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी आपल्या कामाचा अनुभव सांगताना म्हटलं की, “मी देखील सेटवर १६-१८ तास काम केलं आहे. कधीकधी असं वाटायचं की फक्त शरीर काम करत आहे. पण आता मी स्पष्टपणे नकार द्यायला शिकलो आहे. आपण दिग्दर्शक किंवा इतरांसोबत नम्रपणे वागलं पाहिजे, पण तरीही त्यांनी ऐकलं नाही तर एवढचं काम होईल, असं सांगताही आलं पाहिजे. शिवाय आजचं जे काही काम होतं ते पूर्ण झालं आहे, आता आपण उर्वरित काम उद्या करू.असंही दिग्दर्शकाला सांगता आलं पाहिजे.” असं म्हणत त्यांनी दीपिका पादूकोण हिच्या ८ तास शिफ्टच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.(Bollywood)
================================
=================================
दरम्यान, ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून आता दीपिका पादूकोण (Deepiak Padukone) आऊट झाली असून संदीप रेड्डी वांगा Animal चित्रपटानंतर पुन्हा एकदा या चित्रपटासाठी Tripti Dimri सोबत काम करणार असं सांगितलं जात आहे. तसेच, दीपिकाने स्पिरिटसाठी २० कोटी मानधन मागितल्याचं देखील म्हटलं गेलं होतं आणि याच मुद्द्यावरुन आता तृप्ती केवळ १० कोटी मानधन घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दीपिकाला रिप्लेस केल्यानंतर तृप्ती डिमरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? आणि इंडस्ट्रीत ठराविक तासांची शिफ्ट असावी ही कलाकारांची मागणी पुर्ण होणार का? हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.(Bollywood news)