‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
या सिनेमासाठी दिलीप कुमारने सेन्सॉर बोर्डाशी सहा महिने लढा दिला!
अभिनेता दिलीप कुमार हे स्वतःच एक एक्टिंग इन्स्टिट्यूट होते. त्यांचा अभिनय पाहून राजेंद्रकुमारपासून शाहरुख खान देखील प्रभावीत झाले होते. महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगमधील लिहिताना म्हणाले होते की, ”मी सिनेमात येताना माझ्या डोळ्यासमोर दिलीप कुमार यांचे चित्रपट आणि त्यांचा अभिनय होता. तो पाहूनच मी चित्रपटात यायचा निर्णय घेतला!” दिलीप कुमार पन्नासच्या दशकातील सुपरस्टार होते. (Gunga Jumna)
१९६१ साली त्यांची निर्मिती असलेला ‘गंगा जमुना’ (Gunga Jumna) हा चित्रपट प्रदर्शित झाला. अवधी भाषेत असलेला हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट सेंसर बोर्डाच्या तडाख्यात मात्र जबरदस्त अडकला होता. तब्बल सहा महिने दिलीप कुमारने सेन्सर बोर्डसोबत लढा दिला. सेन्सर बोर्डाने या सिनेमात तब्बल २५० कट्स सुचवले होते आणि ए सर्टिफिकेट द्यायला देखील सेन्सर बोर्ड तयार नव्हते. दिलीप कुमार मात्र आपल्या निर्मितीवर ठाम होते. त्यांनी सेन्सर बोर्डाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र मीटिंग घेऊन आपला मुद्दा पटवण्याचा वेळ व्यवस्थित प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही.
त्या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. बी व्ही केसकर होते. त्यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात भारतीय चित्रपट आणि चित्रपट संगीत यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला. त्यांनी ऑल इंडिया रेडिओवरून चित्रपट संगीताला आणि क्रिकेट कॉमेंट्रीला संपूर्णपणे हद्दपार केले होते आणि फक्त शास्त्रीय संगीत चालू ठेवले होते. भारतीय चित्रपट संगीताचा तो गोल्डन इरा होता. रेडिओ हेच करमणुकीचे आणि स्वस्तातले मुख्य साधन होते. याच काळात तिकडे श्रीलंकेमध्ये रेडिओ सिलोनची सुरुवात झाली आणि त्या मुळे भारतीय श्रोते तिकडे वळाले. जाहिरातींचा ओघ तिकडे वाढला नंतर भारत सरकारला उशिरा जाग आली आणि भारतात विविध भारतीवर चित्रपट संगीताला सुरुवात झाली! तर असे होते बी व्ही केसकर!
त्यांनी ‘गंगा जमुना’ (Gunga Jumna) या चित्रपटाने भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होईल अशी भीती दाखवत चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्याच्यावर बंदी आणली. दिलीप कुमार यांनी भरपूर पैसा आणि मेहनत या सिनेमासाठी लावली होती. त्यांनी शेवटचा पर्याय निवडला. त्यांनी थेट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटण्याची विनंती केली. पंतप्रधान नेहरूंनी त्यांना पंधरा मिनिटाचा वेळ दिला. या मिटींगला इंदिरा गांधी देखील उपस्थित होत्या.
दिलीप कुमार यांनी आपली बाजू व्यवस्थित रित्या नेहरूंना पटवून सांगितली. त्यांच्या मते “हा चित्रपट भारतात पहिल्यांदाच डाकूंच्या जीवनावरचा आहे हा सिनेमा ऑथेंटिक असल्यामुळे यातील संवाद, वेशभूषा केशभूषा आणि प्रसंग हे नैसर्गिक वाटावे असे चित्रित केले आहे. आपण जगभरातील सिनेमाचे तुलना करता हा बऱ्यापैकी रियालिस्ट सिनेमा आहे. तुम्ही या सिनेमाकडे पारंपारिक नजरेतून न पाहता पुरोगामी विचारांनी पहा. तुम्हाला हा सिनेमा योग्य वाटेल!”
दिलीप कुमार यांची कन्व्हेन्स करण्याची स्टाईल नेहरू यांना आवडली. त्यांनी चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिला. काही जुजबी कट्स मान्य करून हा चित्रपट जानेवारी १९६१ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या वर्षीचा तो सुपरहिट सिनेमा ठरला. आज जवळपास साठ- पासष्ट वर्षानंतर आपण जेव्हा हा सर्व इतिहास वाचतो तेव्हा त्या काळातील भारतीय समाज मनाची आणि सेन्सॉर बोर्डाची परिस्थिती लक्षात येते. दिलीप कुमार यांनी मात्र मोठ्या कौशल्याने हा प्रश्न व्यवस्थित हाताळला! पण सेन्सर बोर्डाची लढा घेतल्याने दिलीप कुमारने कानाला खडा लावला आणि आयुष्यात परत पुन्हा कुठल्या चित्रपटाची निर्मिती त्याने केली नाही!
‘गंगा जमुना’ (Gunga Jumna) हा भारतीय सिनेमातील एक महत्त्वाचा चित्रपट होता. याचे दिग्दर्शन नितीन बोस यांनी केले होते. चित्रपटाला संगीत नौशाद अली यांचे होते; तर गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती. या चित्रपटामध्ये दिलीप कुमार, वैजयंतीमाला आणि नासिर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिलीप कुमार आणि नासिर खान या दोन संख्या भावंडांनी गंगा जमुना या चित्रपटातील भावंडांची भूमिका केली होती. या चित्रपटाची चित्रीकरण उत्तर प्रदेशातील अवध भागातील गोंडा जिल्ह्यात केले होते.
हा चित्रपट बऱ्यापैकी वास्तववादी बनला होता. चित्रपट टेक्निकलर असल्यामुळे संपूर्ण भारतात त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. वैजयंतीमालासारखी दाक्षिणात्य अभिनेत्री हिने देखील अवधी भाषा खूप चांगल्या पद्धतीने पडद्यावर साकारली. दिलीप कुमार यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनात आणि संकलनात मोठा रस घेतला होता. या चित्रपटाचे छायाचित्रण व्ही बाबासाहेब यांनी केले होते. त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला.
=======
हे देखील वाचा : किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!
=======
या चित्रपटातील गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहेत ‘नयन लड जईहो‘, ‘ना मानू ना मानू रे दगाबाज तोरी बतिया‘, ‘दो हंसो का जोडा बिछड गयो रे’, ढूढो ढूढो रे साजना मोरे कान का बाला’, इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के ही गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहे हेमंत कुमार यांच्या स्वरातील इन्साफ की दर्पे हे गाणं जर टॉप टेन देशभक्तीपर गीत गणले जाते. हा चित्रपट बॉलीवूडचा पथदर्शक सिनेमा ठरला. पुढचे अनेक चित्रपट या ‘गंगा जमुना’ची (Gunga Jumna) प्रेरणा घेऊन बनले. यातील महत्त्वाचा चित्रपट म्हणजे यश चोप्रांचा ‘दिवार’.