
लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले थक्क!
Aishwarya Rai: आधुनिक काळात लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत समाजात वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. काही लोक हे वैयक्तिक स्वातंत्र्य मानतात, तर काहींना वाटतं की हे आपल्या पारंपरिक मूल्यांशी विसंगत आहे.बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय आपल्या प्रत्येक गोष्टीला सुसंस्कृत आणि नम्र पद्धतीने मांडते. त्यामुळेच त्यांना “ब्युटी विथ ब्रेन” असं म्हटलं जातं. ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल फारसा उघडपणे बोलत नाही. मात्र काही काळापूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. तरीसुद्धा ऐश्वर्याने या विषयावर कधीच थेट काही भाष्य केलं नाही. तिच्या एका जुन्या इंटरव्ह्यूमध्ये, जेव्हा तिला एक वादग्रस्त प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने अत्यंत शांत, विचारपूर्वक आणि सुसंस्कृत पद्धतीने उत्तर दिलं. या उत्तरामुळे लोक तिच्या व्यक्तिमत्त्वावर भारावून गेले. त्या मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की प्रत्येक व्यक्तीची स्वतःची निवड, मतं आणि सीमा असतात आणि इतरांच्या मतांचा आदर करणं महत्त्वाचं आहे.(Aishwarya Rai On Physical Relation)

हा प्रश्न तिला The Oprah Winfrey Show मध्ये विचारण्यात आला होता.तिला विचारण्यात आलं होत की, भारतात प्रेम आणि आपुलकी उघडपणे का दाखवली जात नाही? त्यावर ऐश्वर्याने उत्तर दिलं की, “प्रेम ही एक भावना आहे, जी फक्त दाखवण्यासारखी नसते. आपल्या संस्कृतीमध्ये या भावना सार्वजनिकपणे व्यक्त करणं योग्य मानलं जात नाही. आपण रस्त्यांवर लोकांना किस करताना पाहत नाही आणि चित्रपटांमध्येही हीच संस्कृती दिसून येते. भारतीय समाजात लग्नाआधी शारीरिक संबंध ही एक वैयक्तिक आणि संवेदनशील बाब मानली जाते. यावर प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात, आणि ती त्यांच्या संस्कृती, विचारसरणी आणि वैयक्तिक मूल्यांवर अवलंबून असतात.” तिने पुढे सांगितलं की, “कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नये. आपल्या नात्यात परस्पर सन्मान असावा आणि जर तुम्ही लग्नाआधी शारीरिक जवळीकबाबत विचार करत असाल, तर त्या निर्णयाचे सर्व पैलू समजून घेणं आवश्यक आहे.”

तिचं हे उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं, कारण एक मॉडर्न आणि ग्लॅमरस अभिनेत्री भारतीय संस्कृतीचा एवढा आदर करत असेल, हे त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडचं होतं. या मुलाखतीत ऐश्वर्याने कुटुंबाविषयीही आपलं मत मांडलं. तिने सांगितलं की, भारतीय लोक त्यांच्या कुटुंबाला खूप महत्त्व देतात आणि त्यांच्यासोबत राहणं पसंत करतात. सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं ही आपल्या संस्कृतीची खासियत आहे.(Aishwarya Rai On Physical Relation)
=================================
हे देखील वाचा: ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे थेट स्वतःच आयलंड…
==================================
तिचं नाव काही काळ सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत जोडलं गेलं होतं, पण हे संबंध फार काळ टिकले नाहीत. शेवटी तिच्या नशिबात अभिषेक बच्चन लिहिलेला होता. दोघांची ओळख “दुश्मन” या चित्रपटाच्या सेटवर झाली, पण “ढाई अक्षर प्रेम के” च्या दरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली. “गुरू” या चित्रपटाच्या वेळेस त्यांचं प्रेम खुलून आलं आणि अभिषेकने ऐश्वर्याला प्रेमाची कबुली दिली. खास गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय वयाने अभिषेकपेक्षा मोठी आहे, पण हे कधीच त्यांच्या नात्याच्या आड आलं नाही.