‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुनील शेट्टीएवजी संजय दत्त साकारणार होता शाम ही भूमिका…
१९७१ साली प्रदर्शित टिव्ही मुव्ही सी द मॅन रन वरुन १९८९ मध्ये मल्याळममध्ये रामोजीराव स्पिकींग’ हा चित्रपट आला होता. हे दोन चित्रपट म्हणजे हेराफेरी (Hera Pheri) चित्रपटाचे प्रेरणास्थान.
हेराफेरीतील बाबुराव गणपतराव आपटे, राजू, शाम हे तिघं कॉमेडीच्या इतिहासात आज अजरामर झाले आहेत. या तिघांशिवाय आपण या चित्रपटाची कल्पनाच करु शकत नाही, या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दिग्दर्शक प्रियदर्शन हे यशस्वी समीकरण पहिल्यादा जुळले, अक्षय कुमार तेव्हा ॲक्शन स्टार म्हणून ओळखला जाई. त्याला त्याचं त्याच भूमिका करून कंटाळा आल्याने त्याने प्रियदर्शनकडे राजूची भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली. आणि प्रियदर्शनने ती अशी पूर्ण केली की, या चित्रपटाने अक्षयच्या कारकिर्दीला नवे वळण दिले.
या चित्रपटातील शामची भूमिका संजय दत्तला देण्यात आली होती. पण कोर्टात रोज हजेरी देणं बंधनकारक करण्यात आले असल्या कारणाने त्याला हे शक्य झाले नाही आणि भूमिका सुनील शेट्टीला (Sunil Shetty) मिळाली. तेच तब्बूच्या भूमिकेबाबत झालं. पहिले ही भूमिका करीश्मा कपूरला दिली गेली. सुरुवातीला होकार कळवून तिने नंतर वैयक्तिक कारणासाठी चित्रपट नाकारला.
३१ मार्च २००० रोजी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला चित्रपट फारसा यशस्वी नव्हता, पण तीन चार आठवड्यानंतर मात्र तुफान चालला. आज हेराफेरी एक कल्ट सिनेमा मानला जातो. एका प्रसिद्ध वृत्तसमूहाने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात सर्वकालिक सर्वोत्तम चित्रपटाचा बहुमान हेराफेरीने मिळवला.
या चित्रपटाने अनेक गोष्टी बदलल्या. परेश रावल (Paresh Rawal) यांना चरित्र नायक अथवा खलनायक या साच्यातून या चित्रपटाने बाहेर काढलं. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांना गबरु नायक भूमिकेतून विनोदाचा नवा मार्ग हेराफेरीने दाखवला. साचेबध्द विनोदाच्या पलीकडं या चित्रपटाने रसिकांना नेलं. टिपीकल हिरो हिरोईन साच्यातुन बाहेर काढलं. या अर्थाने हा चित्रपट वेगळा ठरला.
फार कमी चित्रपट असे असतात जे कोणत्याही क्षणापासून पाहिले तरी तोच आनंद देतात. हेराफेरी हा तसा चित्रपट आहे. या चित्रपटातील संवादांनी २१ वर्षापासून धुमाकूळ घातला आहे. तो आजतागायत कायम आहे. चला तर या सदाबहार सिनेमाची एकवीशी साजरी करताना आम्हाला सांगा तुम्हाला या सिनेमातील प्रचंड आवडलेला संवाद शुरु हो जाओ…
=====
हे नक्की वाचा: परेश रावल… बहुरंगी, बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!!
=====