Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘पोन्नियन सेल्वन’2 चे आगमन?

 ‘पोन्नियन सेल्वन’2 चे आगमन?
कलाकृती विशेष

‘पोन्नियन सेल्वन’2 चे आगमन?

by amol238 17/11/2022

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पोन्नियन सेल्वन 1 या भव्यदिव्य चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर राज्य केलं.  बक्कळ कमाई केलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता मणिरत्नम यांच्या चाहत्यांना होती. त्यांच्यासाठी एक खुशखबर आली आहे.  कारण पोन्नियन सेल्वन (Ponnian Selvan) या चित्रपटाचा दुसरा भाग 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या पडद्यावर येईल अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. पोन्नियन सेल्वन हा एक भव्यदिव्य चित्रपट आहे. कल्‍की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्‍या पोन्नियन सेल्वन(Ponnian Selvan) या लोकप्रिय तमिळ कादंबरीवर चित्रपट बनवण्याचं स्वप्न अनेक मान्यवर दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी पाहिलं. मात्र प्रत्येकवेळा अडचणी आल्या. अगदी चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाल्यावरही थांबवण्यात आले. या चित्रपटासाठी भव्यता ही पहिली गरज होती, आणि त्यासाठी भलामोठा निधीही. 

यामुळेही चित्रपट प्रत्यक्षात येऊ शकला नाही.  मात्र मणिरत्नम यांना पोन्नियन सेल्वन या कादंबरीनं मोह पाडला होता.  त्यांनी अनेक मुलाखतीत पोन्नियन सेल्वन(Ponnian Selvan) या कादंबरीवर होणा-या चित्रपटाला ड्रीम प्रोजेक्ट असेच संबोधले होते. शेवटी मणिरत्नम यांचे हे स्वप्न साकार झाले. चित्रपट आधी एकाच भागाचा होता, मात्र शुटींग सुरु झाल्यावर हा आवाका मोठा असल्याची जाणीव मणिरत्नम यांना झाली आणि पोन्नीयन सेल्वन चित्रपटाचे दोन भाग करण्याची योजना मणिरत्नम यांनी केली. त्यामुळे पहिल्या भागामध्येच दुस-या भागाचेही शुट करण्यात आले.  त्यामुळेच ब-याच वेळा चित्रपटाचा दुसरा भाग येण्यास उशीर होतो, पण भव्यदिव्य असलेल्या पोन्नीयन सेल्वनच्या दुस-या भागाचे चित्रिकरण ब-यापैकी झाले असून आता त्याचे पोस्टप्रोडक्शन चालू आहे. म्हणूनच येत्या एप्रिलमध्ये पोन्नियन सेल्वनचा दुसरा भाग मोठ्या पडद्यावर येत आहे.  

पोनियन सेल्वनच्या (Ponnian Selvan)पहिल्या भागाने जगभरात 450 कोटी रुपयांची कमाई केली असून अद्यापही काही चित्रपटगृहात पोन्नियन सेल्वनचे शो होत आहेत. प्रसिद्ध लेखक कल्‍की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्‍या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटात दिग्गज कलाकार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, कार्ती आणि जयम रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे.  30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.  

आता त्याच्या पुढच्या भागाचे, म्हणजेच पोन्नीयन सेल्वन (Ponnian Selvan)2 चे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे.  चित्रपटाच्या या दुस-या भागापासून प्रेक्षकांनाही मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटातील अ‍ॅक्शन आणि कलाकारांच्या शानदार अभिनयाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा चित्रपटाच्या सेटची झाली.  सोबत कपडे आणि दागिन्यांचीही चर्चा झाली. पोन्नियन सेल्वनच्या फॅशनचा एक ट्रेंडच आला.  आता दुस-या भागात यापेक्षा काय अधिक मिळणार याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  PS1 मधून ऐश्वर्या बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसली.  दुस-या भागात तिच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.  विक्रमसोबतचा हा ऐर्श्वयाचा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी रावण चित्रपटात काम केले आहे.  1955 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीवर यापूर्वीही अनेकवेळा चित्रपट काढण्याचा प्रयत्न झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक एम.जी. रामचंद्रन यांनीही हा प्रयत्न केला. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांचे स्वप्न साकार झाले नाही. 

=======

हे देखील वाचा : अभिनय सम्राट दिलीपकुमार यांची कृतज्ञता!

=======

त्यानंतर 1980 आणि 2010 मध्येही कादंबरीवर चित्रपट काढण्याचा प्रयत्न झाला.  पण तो प्रत्यक्षात आला नाही. त्यामुळे पोन्नियन सेल्वन हा अनेकांसाठी ड्रीम प्रोजेक्ट ठरला.  हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी दिग्दर्शक मणिरत्नम यांनी जानेवारी 2019 मध्ये प्रयत्न सुरू केले. डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी शुटींगही सुरु केले.  मध्यंतरी आलेला कोव्हिडचा अडथळा पार करत सप्टेंबर 2021 मध्ये चित्रपटाचे शुटींग समाप्त झाले. अगदी थायलंडमध्येही पोन्नियन सेल्वनचे शुटींग झाले आहे.  पहिल्या भागातच दुस-या भागाचे शुटींगही करण्यात आले, त्यामुळे शुटींग लांबले तरी त्याचा फायदा दुस-या भागासाठी झाला आहे. पोन्नियन सेल्वनच्या पहिल्या भागानं 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट हा बहुमान मिळवला आहे.  त्यामुळेच पोन्नियन सेल्वनचा दुसरा भाग बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डतोड कमाई करेल असा अंदाज आतापासूनच व्यक्त होत आहे.  

पोन्नियन सेल्वनची(Ponnian Selvan) कथा चोल राजवंशाच्या भोवती फिरते. तंजावरमध्ये 10व्या शतकात, सम्राट सुंदरा चोझर यांच्या कारकिर्दीत, चोल राजवंश दक्षिण भारतात समृद्धपणे राज्य करत होता. त्या राजवंशाची कथा पोन्नियन सेल्वनमध्ये आहे.  ही कथा फक्त राजवंशापर्यंतच थांबत नाही. तर तत्कालिन भारतीय संस्कृती, संपन्नता याची माहितीही देत आहे. त्यामुळेच तरुण पिढीनंही या चित्रपटाला अधिक पसंती दिली.  आता पोन्नियन सेल्वनच्या दुस-या भागाचीही उत्सुकता वाढली आहे.

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Featured Movie Ponnian Selvan 2
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.