Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sundar Mi Honar Natak: ‘बेबीराजे’च्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे; Swanandi Tikekar ला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास…

 Sundar Mi Honar Natak: ‘बेबीराजे’च्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे; Swanandi Tikekar ला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास…
Swanandi Tikekar Marathi Natak
नाट्यकला मिक्स मसाला

Sundar Mi Honar Natak: ‘बेबीराजे’च्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे; Swanandi Tikekar ला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास…

by Team KalakrutiMedia 28/04/2025

Sundar Mi Honar:  मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा – पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारतेय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर.(Swanandi Tikekar Marathi Natak)

Swanandi Tikekar Marathi Natak
Swanandi Tikekar Marathi Natak

स्वानंदी जवळपास तीन वर्षांनंतर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. याआधी ‘१०३’, ‘डोंट वरी बी हॅपी’ सारख्या लोकप्रिय नाटकात झळकलेली ही अभिनेत्री, सध्या हिंदीतील ‘महानगर के जुगनू’ आणि इंग्रजीत ‘मिडल क्लास ड्रिम्स ऑफ समर नाईट’ या दोन नाटकांत भूमिका साकारत आहे. मात्र ‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने ती पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे वळली आहे.

Swanandi Tikekar Marathi Natak
Swanandi Tikekar Marathi Natak

“मला निर्माता आकाश भडसावळेचा फोन आला, आणि त्याने विचारलं – ‘नाटक करणार का?’ त्याचवेळी त्याने या नाटकाचं नाव सांगितलं आणि मला वाटलं, इतकी सुंदर संहिता आणि तेही पुलंचं नाटक – मी नाही म्हणण्याचा विचारच करू शकले नाही,” असं स्वानंदी सांगते. पुलंच्या लेखणीबद्दल असलेला आदर आणि त्यांच्या नाट्यसंहितेची ताकद तिच्या शब्दांमधून सहज उमटत होती.

Swanandi Tikekar Marathi Natak
Swanandi Tikekar Marathi Natak

‘बेबीराजे’ ही व्यक्तिरेखा तिच्या अंतर्मनाच्या अगदी जवळची आहे. ही व्यक्तिरेखा थोडीशी बंडखोर, मतस्वातंत्र्य असलेली, आणि आत्मभान जपणारी आहे – म्हणजेच आजच्या काळाशी पूर्णतः सुसंगत. “बेबीराजे नेमकी माझ्यासारखी वाटते. तिची स्वतःची मतं आहेत. ती आपलं काहीतरी वेगळं शोधू पाहते. जे आपल्याला सहज मिळालंय, त्याच्या पलीकडेही काही आहे का, हे शोधणारी ती – म्हणूनच मला ही भूमिका फारच भावली,” असं ती भावनिक स्वरात म्हणाली.
पुलंच्या नाटकात काम करणं ही तिच्यासाठी केवळ कलात्मक संधी नाही, तर श्रद्धेचा अनुभव आहे. “मी हे नाटक पाहिलं होतं, पण वाचलं नव्हतं. आणि आता पुलंच्या स्वतःच्या हातून लिहिलेल्या ओळी रंगमंचावर बोलता येणार आहेत, ही कल्पनाच खूप पवित्र वाटते,” असेही ती नम्रतेने मान्य करते..

==================================

हे देखील वाचा: April May 99: बोमन इराणी यांच्या उपस्थितीत ‘एप्रिल मे ९९’ मधील ‘समर हॅालिडे’ गाणे लाँच…

===================================

या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे करणार आहेत. देशपांडे यांनी यापूर्वीही पु. ल. देशपांडे यांचं ‘ती फुलराणी’चं दिग्दर्शन केलं आहे. त्याचबरोबर भाषाप्रभू वसंत कानेटकर यांचं ‘हिमालयाची सावली’ याही नाटकांचं दिग्दर्शन करून त्यांनी कानिटकरी भाषेला न्याय दिला आहे. त्यांचा रंगभूमीवरील अनुभव ‘सुंदर मी होणार’च्या नव्या सादरीकरणात मोठा विश्वास निर्माण करतो. नाटकाचा शुभारंभ पुलंच्या २५ व्या स्मृतीदिनी म्हणजेच गुरुवार १२ जून २०२५ या दिवशी पुण्यात आणि शुक्रवार १३ जून या दिवशी मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे नाटकातील अजून तीन महत्वाच्या व्यक्तीरेखा महाराज, डॉक्टर आणि सुरेश कोण साकारणार याबद्दल रसिकांमध्ये उत्कंठा आहे.(Swanandi Tikekar Marathi Natak)

===================================

हे देखील वाचा: Jaran Movie: अनिता दाते साकारणार ‘जारण’ मध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका; पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष…

====================================

‘सुंदर मी होणार’ ही केवळ एका घराच्या चार भिंतींत घडणारी घटना नाही – ती एका संपूर्ण युगाच्या मानसिकतेचा आरसा आहे. आणि त्या आरशात ‘बेबीराजे’सारखी व्यक्तिरेखा उभी करताना स्वानंदी टिकेकर पुन्हा एकदा रंगभूमीवर तीव्रतेनं, सच्चेपणाने आणि सुंदरतेने उमटेल असा विश्वास वाटतो.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Marathi Natak pu.l . deshpande rajesh deshpande Sundar Mi Honar Natak Swanandi Tikekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.