
Milind Gawali ‘एका गोष्टीची खंत वाटली…’ मराठी अभिनेत्याने १०३ वर्ष जुनी वास्तू पाहून व्यक्त केल्या भावना
आपल्या देशामध्ये अनेक अशा वास्तू आहे ज्या आपल्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत आहेत. यासोबतच अनेक इतिहासप्रेमींनी एकत्र येते आपल्या पराक्रमी आणि शूर पूर्वजांच्या अनेक वापरत्या वस्तू जतन केल्या आहेत. या सर्व गोष्टी आज आपल्याला इतक्या वर्षांनी देखील पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. या सर्व वस्तू संग्रहालयात जपून ठेवल्या जातात. या सर्व वस्तू आपल्यासारखे सामान्य लोकं अगदी सहज संग्रहालयात जाऊन त्या पाहू शकतात. (Milind Gawali Post)
अशाच जुन्या वस्तू जपून ठेवलेले मुंबईत एक प्रसिद्ध संग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेले हे संग्रहालय जवळपास १०० वर्ष जुने आहे. यात काही शे वर्षांपासूनच्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. नुकतीच अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी या वस्तु संग्रहालयाला भेट दिली. याचा अनुभव त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे. सोबतच त्यांनी एक सुंदर असा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हे संग्रहालय दिसत आहे. (Milind Gawali)
मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई, पूर्वी याचं नाव होतं प्रिन्स ऑफ व्हील्स म्युझियम, 103 वर्षांपूर्वी हे म्युझियम बांधलं होतं, 10 जानेवारी 1922 साली याचं उद्घाटन झालं, इंग्रजांनी हे बांधलं होतं, त्यांनी नंतर गेटवे ऑफ इंडिया बांधलं, मुंबई हायकोर्ट बांधलं, दिल्लीला इंडिया गेट बांधलं, राष्ट्रपती भवन पण त्यांनी बांधलं, मुंबई मुनिसिपल कॉर्पोरेशनची बिल्डिंग, क्रॉफर्ड मार्केट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई युनिव्हर्सिटी ची बिल्डिंग, त्या वेळचं इतकं सुंदर architectural आणि आजही भक्कम बांधकाम. (Social News)
परवा काला घोडा फेस्टिवलला गेलो आणि या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पण गेलो, या वास्तू बघून फारच भारी वाटतं, या ब्रिटिशरांच्या आधी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेत, आजही किल्ल्यांवर गेलं की खूपच भारी वाटतं, इतिहास डोळ्यासमोर येतो, त्या काळात इतकं भव्य दिव्य बांधकाम कसं केलं असेल याची कल्पना सुद्धा करता येत नाही.
या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये 50 हजार होऊन अधिक पुरातन काळातल्या वस्तू आहेत, त्यातला एक भाग आहे पूर्वीच्या चलनातल्या नाणी, त्याच्यामध्ये मी शिवाजी महाराजांच्या काळाची “होण”, नाणी पाहिली, सुवर्णमुद्रा बघायला मिळाली, मी महाराजांच्या काळाच्या या सुवर्णमुद्रा पहिल्यांदाच पाहिल्या, या आधी मी या संग्रहालयात गेलो होतो पण, त्यावेळेला ‘होण’पाहिल्याच माझ्या स्मरणात नाहीये, पण पूर्वच्या मोहींजोदारो, मोगल, ब्रिटिश, छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी पाहून मला फारच भारी वाटलं.
त्याकाळचे दागिने, मुर्त्या, गौतम बुद्धाच्या, आपला देव देवतांच्या मुर्त्या, पुरातन काळातले चित्र, त्यांचे वस्त्र, काही वस्तू तर रतन टाटा यांनी या संग्रहालयाला गिफ्ट दिलेले आहेत, त्या पण इथे बघायला मिळाले, दरवेळेला हे वस्तुसंग्रहालय बघायला येतो आणि वेगळाच अनुभव मिळतो, या वस्तू संग्रहालयातल्या वस्तू तुम्हाला वेगळा विश्वात घेऊन जातात.
========
हे देखील वाचा : Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर
========
यावेळेला माझ्याबरोबर दिपा होती, ती पहिल्यांदा हे वस्तुसंग्रहालय बघत होते, ती पण खूपच भारावून गेली होती, आम्ही शाळेतल्या मुलां सारख्या पूर्वीच्या जुन्या जुन्या वस्तू पाहत होतो, पण हे सगळं पाहून एका गोष्टीची खूप खंत वाटत होती की ह्या ब्रिटिशरांनी आपल्याला देशातल्या किती सुंदर मौल्यवान वस्तू लुटून नेल्या आहेत, आपल्या कोहिनूर हिऱ्याचं रिप्लीका dummy ईथे ठेवलेला आहे. ते बघून तर आणखीन त्रास झाला. आपला हिंदुस्तान किती समृद्ध होता याची पण जाणीव झाली. ज्यांनी कोणी हे पाहिलं नसेल त्यांनी जरूर बघावं ,शाळेतल्या मुलांनी नक्की बघावं”
दरम्यान मिलिंद यांची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत ही चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे. मिलिंद यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी मराठी मालिका विश्वातील गाजलेल्या आई कुठे काय करते या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत अफाट लोकप्रियता मिळवली. काही महिन्यांपूर्वीच ही मालिका संपली. याआधी देखील मिलिंद यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्राटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.