Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”;

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती

स्वतःला समजून घेण्यासाठी Actress Manisha Koirala ने केली ब्रेन मॅपिंग; काय

Operation Sindoor च्या  पार्श्वभूमीवर Aamir Khanने ‘सितारे जमीन पर’ सिनेमाबद्दल घेतला मोठा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

निर्मिती सावंत यांची अशीही फॅन

 निर्मिती सावंत यांची अशीही फॅन
नाट्यकला मिक्स मसाला

निर्मिती सावंत यांची अशीही फॅन

by रश्मी वारंग 14/10/2020

नाट्यकलावंतांना खरी उमेद देतात ते त्यांचे चाहते. एखादं नाटक पुन्हा पुन्हा पहाणारे चाहते, कलाकारांसाठी खास भेट घेऊन येणारे चाहते,कलाकारांच्या भेटीसाठी आटापिटा करणारेच चाहते यांच्यापेक्षा एका खूप वेगळ्या चाहतीचा अनुभव सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी घेतला आहे. ‘डबलट्रबल’ या व्यावसायिक नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करणा-या निर्मिती सावंत यांची जाऊबाई जोरात, शामची मम्मी, व्हॅक्युम क्लीनर, श्री बाई समर्थ अशी सगळीच नाटकं खूप गाजली.

‘शामची मम्मी’ नाटकाचा प्रयोग खेड इथे नव्या नाट्यगृहात होणार होता.  या नाट्यगृहातील तो पहिलाच प्रयोग. नाटकाची पूर्ण तयारी झाली. दुसरी घंटा वाजली. तिसऱ्या घंटेच्या आधी एक मुलगा निर्मितीताईंजवळ आला. तो काही सांगू पहात होता. पण नाटक सुरू व्हायच्या काही क्षण आधी कुठल्याही अन्य कलाकाराप्रमाणे निर्मितीताई पूर्णपणे नाटकाच्या माहोलमध्ये शिरल्या होत्या.त्यामुळे त्यांनी त्या मुलाला नंतर नंतर सांग करत तिथेच थांबवलं.

हेही वाचा : नाट्यप्रयोगात बाळ रडते तेव्हा…

नाटक सुरू झालं. पहिल्याच प्रवेशात निर्मितीताई देवांना नमस्कार करताहेत असं दृश्य होतं. नमस्कार करत करत निर्मितीताईंनी प्रेक्षकात नजर फिरवली. कितीही मोठा कलाकार असला‌ तरी नाटकाचा प्रेक्षकवर्ग कसा आहे हे पाहण्यात प्रत्येक कलाकाराला रस असतोच. तर प्रेक्षकांकडे  पाहताच निर्मितीताईंना धक्काच बसला.समोर चक्क स्ट्रेचरवरून कुणी तरी नाटक पहायला आलं होतं. हा धक्का कसाबसा पचवत निर्मिती ताईंनी ते दृश्य पूर्ण केलं आणि त्या विंगेत आल्या. हे असं काय आहे? हा प्रश्न त्यांना पडला होता. तिसऱ्या घंटेच्या आधी निर्मितीताईंशी बोलू पाहणारा तो मुलगा तिथेच उभा होता. त्याने त्या स्ट्रेचरवरच्या प्रेक्षकाची कथा सांगितली. त्या स्ट्रेचरवर एक दुर्धर आजाराने ग्रासलेली मुलगी होती. दीर्घकाळ ती हॉस्पिटलमध्येच होती.  निर्मिती सावंत यांची ती जबरदस्त फॅन!. त्याकाळी निर्मिती यांची ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ मालिका तुफान गाजत होती. त्या मालिकेतील हे गंगुबाईचं पात्र त्या मुलीला विलक्षण प्रिय होतं त्यामुळे नाटकाच्या दौऱ्यासाठी निर्मिती सावंत खेडला आल्या आहेत हे कळताच हॉस्पिटलमधून रितसर परवानगी घेऊन आणि सगळ्या वैद्यकीय सुविधांसह ती मुलगी स्ट्रेचरवरुन फक्त आणि फक्त निर्मिती सावंत यांना पहायला आली होती. कुठल्याही कलाकाराला नि:शब्द करणारा हा प्रसंग. अर्थातच निर्मिती यांनी त्या मुलीची प्रयोगानंतर भेटही घेतली आणि भविष्यात तिच्याशी  संपर्कही ठेवला.

कित्येक नाटकांतून हाडाचा कसबी कलाकार आपल्या अभिनयामधुन प्रेक्षकांना आनंदानुभव  देत असतो. पण काही वेळा हे असे प्रसंग त्या कलाकाराला माणूस म्हणून, अभिनेता म्हणून समृद्ध करुन जातात.कोणत्याही नाटकातून कमावलेल्या पैशांपेक्षा हे असे क्षण म्हणजे त्या कलाकारांची खरी श्रीमंती!

हे वाचलेत का ? जेव्हा बाळासाहेबांनी दिली होती गलगलेंना दाद…

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Natak marathitelevision Theatre
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.