Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

Salman Khan : “जितकं आयुष्य आहे…”; बिश्नोई गॅंगच्या धमक्यांवर सोडलं मौन
ईदच्या निमित्ताने सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांना ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाची ट्रीट यंदाही मिळणार आहे. ३० मार्च २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात सलमान सोबत नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकणार आहे. सध्या. सलमान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्याने एका मुलाखतीमध्ये त्याला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर भाष्य पहिल्यांदाच केलं आहे. “अल्लाहने जितकं आयुष्य दिलं आहे तितकंच मिळणार” असं म्हणत बिश्नोई गॅंगकडून (Bishnoi Gang) मिळणाऱ्या धमक्यांवर सलमान खानने अखेर मौन सोडलं आहे. (Salman Khan black bug case)
‘सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सलमान खानला एका मुलाखतीमध्ये तुम्हाला धमक्यांची भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला गेला. यावर सलमान म्हणाला, “भगवान, अल्लाह सगळं वरुन बघत आहे. आणि सुरक्षा कडक केली गेली आहे पण इतक्या सुरक्षेचं राहणं कठिण आहे. शिवाय, अल्लाहने जितकं आयुष्य दिलं आहे तितकंच मिळणार”. दरम्यान, सलमान खान (Salman Khan) याला काळवीट प्रकरणामुळे बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. (Bollywood news)

२०२४ म्हणजेच गेल्यावर्षी सलमान खानच्या मुंबईतील बांद्रा परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेन्सबाहेर गोळीबार देखील करण्यात आला होता. याशिवाय, त्याच्या घरच्यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या देत वारंवारघराची रेकी करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर बाबा सिद्दीकी यांची गोळी मारुन हत्या देखील याच कारणामुळे करण्यात आली असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या सलमानच्या घरी कडक बंदोबस्त केला असून त्याच्या सुरक्षेतही वाढ केली आहे. (Entertainment masala)
बिश्नोई गॅंग सलमानच्या मागे लागण्याचं कारण म्हणजे १९९९ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ (Hum Sath Sath Hai) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानने काळविटाची शिकार केली होती. या संदर्भात तब्बू, नीलम, सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनाही कोर्टाने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. बिश्नोई समाजात काळविटाचं खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळेच राजस्थानमध्ये हे प्रकरण झाल्यामुळे बिश्नोई समाज आक्रमक झाला आहे. (Salman Khan news)
===========================
हे देखील वाचा: Salman Khan : ‘सनम तेरी कसम’मध्ये दिसला असता सलमान खान?
===========================
दरम्यान, सलमानच्या आगामी सिकंदर बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात सलमान आणि रश्मिकाची कॅमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ए.आर मुरुगादॉस यांचं दिग्दर्शन असणारा सिकंदर ३० मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रद्रशित होणार आहे. (Bollywood update)