महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
छोटा पॅकेट बडा धमाका: मिनिमम बजेट मॅक्सिमम कलेक्शन
बॉलीवूडच्या सिनेमाच्या बजेटचे आणि कलेक्शनचे आकडे आता आकाशाला भिडले आहेत. केजीएफ, आर आर आर, बाहुबली, पुष्पा या सिनेमांचे बजेटच जाता ५०० कोटी पर्यंत गेले आहे त्यामुळे त्यांचे कलेक्शन देखील तितकेच मोठे असते! आर आर आर हा चित्रपट जेव्हा बनत होता तेव्हा असे म्हटले जायचे जर या सिनेमाने पाचशे कोटी जरी कमावले तर हा सिनेमा फ्लॉप समजला जाईल कारण या सिनेमाचे बजेटच तेवढे आहे! (Jai santoshi maa)
सिनेमाचे बजेट आणि फिल्म रिलीज नंतर होणारे कलेक्शन याचे प्रमाणे त्या सिनेमाचे यश सिद्ध करत असते. आज एक हजार कोटी कमावणे काही फार मोठी गोष्ट राहिलली नाही कारण भारतीय सिनेमाला आता जागतिक मार्केट उपलब्ध झाले आहे. ही अलीकडची परीस्थिती आहे पण एकेकाळी भारतातील सिनेमाचं बजेटच मुळात लाखांमध्ये असायचं त्यामुळे त्यांना मिळणारे यश देखील तेवढेच असायचे! असे असताना देखील ज्याला आपण ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ असे म्हणतो तसे काही चित्रपट होते.
ज्यांचं बजेट खूप कमी होतं पण त्यामानाने त्यांना बॉक्स ऑफिस कलेक्शन जे मिळालं ते फार मोठे होतं. या अलीकडच्या पन्नास वर्षातील चित्रपटांचा जेव्हा आपण आढावा घेऊ तेव्हा पहिलं नाव ठळकपणे डोळ्यापुढे येथे ‘जय संतोषी मां’ (Jai santoshi maa) या चित्रपटाचे. ३० मे १९७५ या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अक्षरशः इतिहास निर्माण केला. खरंतर याच वर्षी ब्लॉकबस्टर ‘शोले’ आणि ‘दिवार’ हे दोन जबरदस्त हिट सिनेमा प्रदर्शित झाले होते. पण या दोन्ही सिनेमांना टक्कर देत ‘जय संतोषी मां’ या सिनेमाने संपूर्ण देशामध्ये जबरदस्त यश मिळवले.केवळ पाच लाख रुपयात तयार झालेल्या चित्रपटाने शंभर पट कमाई करत पाच कोटी रुपये कमावले होते!!
विजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटांमध्ये भारत भूषण, कानन कौशल, अनिता गुहा, आशिष कुमार हे कलाकार होते. भारत भूषण सोडला तर इतर कुठल्याही नावाला किंमत नव्हती. या धार्मिक चित्रपटाला संगीत सी अर्जुन यांचं होतं. तर गाणी प्रदीप यांनी लिहिली होती. सिनेमाचे सर्वच लो बजेट प्रोफाइल होते. पण या चित्रपटाने केवळ माऊथ पब्लिसिटीने इतके प्रचंड यश मिळवले की आजवर बजेट आणि कलेक्शन याचं प्रमाण या सिनेमा इतके कुणी मोडलेलं नाही. ‘जय संतोषी मां’ (Jai santoshi maa) हा चित्रपट बिहारच्या पाटणामध्ये प्रदर्शित झाला होता. तिथे प्रेक्षक आपल्या चपला बाहेर काढून मंदिरात जातात तसे चित्रपटगृहात पाहायला जात होते.
प्रेक्षकांच्या चपला संभाळण्यासाठी एक व्यक्ती तिथे उपस्थित असे. त्या व्यक्तीला लोक स्वेच्छेने दहा- पाच पास पैसे देत असत. हा सिनेमा पाटण्याला तब्बल वर्षभर चालला. चप्पल सांभाळणाऱ्या माणसाला या काळात तब्बल दीड लाख रुपये मिळाले होते! कमीत कमी बजेट आणि अधिकाधिक नफा असं गुणोत्तर पुन्हा दुसऱ्यांदा पाहायला मिळालं राजश्री प्रॉडक्शनच्या ‘नदिया के पार’ या १९८२ साली आलेल्या चित्रपतात. सचिन, साधना सिंग यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये होत्या. हा चित्रपट आपल्या देशाच्या नॉर्थबेल्टमध्ये प्रचंड यशस्वी झाला. केवळ आठ लाख बजेट असलेल्या सिनेमाने त्या काळात साडेचार कोटी रुपयांचा धंदा केला होता.
स्वतः राजश्री प्रॉडक्शन या सिनेमावर इतके फिदा होते की त्यांनी तेरा वर्षानंतर या चित्रपटाच्या कथानकाला मॉडर्न लूक देऊन रिमेक केला. तो चित्रपट होता ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटाने देखील प्रचंड बिजनेस केला! राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने देखील कमी बजेट असून देखील चांगला बिझनेस केला. केवळ दोन कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने त्या काळात तब्बल ४० कोटी रुपये कमावले. राजश्री प्रॉडक्शन ही चित्र संस्था आर्थिक डबघाईला आलेली असताना ‘मैने प्यार किया’चे प्रचंड यश या संस्थेला चिरंजीवीत्व देऊन गेलं. (Jai santoshi maa)
=========
हे देखील वाचा : जतीन खन्नाचा राजेश खन्ना कसा झाला?
=========
कोरोनानंतर अतुल अग्निहोत्री यांनी ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पुढे आणला. केवळ १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या सिनेमाने तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा बिजनेस केला! महेश भट यांच्या ‘आशिकी’ या चित्रपटाने नव्वदच्या दशकामध्ये असाच करिष्मा केला होता. कांती शहां यांचा ‘गुंडा’ हा अनेक अर्थाने कुप्रसिध्द असलेला सिनेमा. तो रिलीज झाल्यावर त्याचावर कोर्टाने बंदी आणली. नंतर आठ दहा वर्षानी या सिनेमाची डिव्हीडी आली प्रचंड हिट झाला. या ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ लिस्टमध्ये अनेक चित्रपट आपल्याला टाकता येतील. ज्यामध्ये तारे जमीन पर, पानसिंग तोमर, विकी डोनर, नो वन किल्ला जेसीका हि नावे पटकन डोळ्यापुढे येतात. तुम्हाला या श्रेणीतील कुठले सिनेमे आठवतात?