Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

Chhaava box office Collection : रंगांची धुळवड ’छावा’साठी ठरली बुस्टर!
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) या चित्रपटाने एकामागून एक नवे रेकॉर्ड करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. ५०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी या चित्रपटाला अधिक बुस्टर डोस मिळाला आहे. खरं तर सणासुदीला त्यातही रंगपंचमी साजरी करत असताना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला जाऊ शकतो हे जरा कठिण आहेच म्हणा. पण ‘छावा’ चित्रपटाच्या बाबतीत हे उलट झालं असून लोकांनी आवर्जून थिएटरमध्ये जात छावा पाहिला असून त्याचं रिफलेक्शन बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून आलं आहे. (Chhaava box office collection)
२०२५ या वर्षातील ‘छावा’ (Chhaava movie) हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे ज्याने ५०० कोटींचा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करत ‘बाहुबली २’, ‘पठाण’, ‘अॅनिमल’ (Animal), ‘गदर २’ अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार ‘छावा’ चित्रपटाने शुक्रवारी २९ व्या म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी ६.५ कोटी कमवत एकूण ५४६.७५ कोटी कमावले आहेत. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी कमावले होते. (Entertainment masala)

‘छावा’ (Chhaava) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा भव्यतेने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. विकी कौशलने (Vicky Kaushal) यात शंभू राजांची भूमिका साकारली असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका (Rashmika Mandanna) झळकली आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, संतोष जुवेकर, किरण करमरकर असे मराठी कलाकारही झळकले आहेत. (Bollywood tadaka)
===============================
हे देखील वाचा :Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?
===============================
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाकडे अजून कमाई करण्यासाठी २८ मार्चपर्यंतचा वेळ आहे. कारण, त्यादिवशी सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता ‘सिंकदर’ चित्रपटाला छावा टक्कर देणार की मागे पडणार हे आता येणारा काळच सांगेल. (Bollywood upcoming films)