Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून लांब का गेली?
बॉलिवूड म्हटलं की दोन शब्द हे कॉमन असतात. एक म्हणजे ग्लॅमर आणि दुसरं म्हणजे नेपॉकिड्स…खरं तर नेपॉकिड्स ही संकल्पना जरी आता फार अधोरेखित केली जात असली तरी कपूर घराण्यापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिझम (Nepotism) सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये स्टार किड्स चित्रपटांमध्ये आले. काही जणं आपल्या आई वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीत टिकले तर काही जणांना अभिनय झेपलाच नाही. अशाच एका सुपरस्टारच्या मुलीने केवळ ३ चित्रपट करुन हिंदी चित्रपटसृष्टीला राम राम केला आहे. कोणा आहे ही अभिनेत्री जाणून घेऊयात..(Entertainment trending news)

तर, २०१५ मध्ये आलेल्या हिरो चित्रपटातून अथिया सुनील शेट्टी हिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिच्यासोबत सुरज पंचोली झळकला होता. यानंतर, तिने ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ असे दोन चित्रपट केले. पण वडिल Suneil Shetty सारखे तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत णि त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं नाही. आणि त्यानंतर मात्र तिने अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ती तिचा मातृत्वाचा फेज आनंदाने घालवतेय असं सुनील यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.(Bollywood update)
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने मुलगी अथिया हिने इंडस्ट्री सोडल्याच्या वस्तुस्थितीवर भाष्य केलं. शेट्टी म्हणाला, अथियाने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे कारण तिला आता तिच्या आयुष्यातील एक नवीन आणि खास टप्पा म्हणजे आईत्व पूर्णपणे स्वीकारायचं आहे.(Entertainment news)

पुढे सुनील शेट्टीने सांगितलं की, ‘मोतीचूर चकनाचूर’ नंतर, अथियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तिला त्यात रस नव्हता. तिने मला स्पष्ट सांगितले की बाबा मला हे करायचे नाही आणि ती निघून गेली. मी तिच्या प्रामाणिकपणाची आणि स्पष्टतेची प्रशंसा करतो. आज ती तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भूमिका साकारत आहे, ती म्हणजे एका आईची. आणि ती ही नवी जबाबदारी मनापासून जगत आहे. अथिया शेट्टी हिने भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल याच्याशी लग्नगाठ बांधली होती. आणि त्यांना गोंडस कन्यारत्न झालं असून तिचं नाव इवारा असं आहे.(Bollywood tadaka)
===============================
हे देखील वाचा: Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’; २० वर्षांनंतर मुकेश खन्ना करणार दमदार पुनरागमन !
===============================
एकीकडे अथिया शेट्टीने(Athiya Shetty) बॉलिवूडपासून दूर जाण्याचा घेतलेला निर्णय सुनील शेट्टीने आनंदाने स्वीकारला आहे. तर दुसरीकडे शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या दोन्ही मुलांना आर्यन आणि सुहाना यांना लॉंच करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. तसेच, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) देखील स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीचं भवितव्य केवळ नेपोकिड्स वर अवलंबून राहणार आहे की इतर होतकरु कलाकारांनाही आपलं टॅलेंन्ट सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे हे येणार काळच ठरवेल.(Bollywood and nepotism)