
Sai Tamhankar : “वशीला लावून तुझं काम कधीच करुन देणार नाही”, सईचे वडिल असं का म्हणाले?
मराठीसह हिंदीतही आपला ऑरो निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ती इम्रान हाश्मी ( Emraan Hashmi) सोबत ‘ग्राऊंड झिरो’ (Ground Zero) या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. तर दुसरीकडे ‘गुलकंद’ (Gulkand) हा तिचा मराठी चित्रपट १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका मुलाखतीमध्ये आई-वडिलांनी तिचे लाड आणि मार देत कसं लहानाचं मोठं केलं याबद्दल तिने सांगितलं. नेमकं अभिनेत्री काय म्हणाली? वाचा… (Marathi celebrity news)

सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) ‘लोकमत सखी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “आई-वडिलांनी माझे लाडही केले आहेत आणि तितकाच मी मारही खाल्ला आहे. मी हँगर, चप्पल, लाटणे या सगळ्या गोष्टींनी मार खाल्ला आहे. लहानपणी मी खूप दंगेखोर मुलगी होते. थोडीशी बंडखोरही होते. एखादी गोष्ट करू नकोस, असं सांगितलं, तर मला ती आधी करून बघायची खुमखुमी होती. खूप छान छान गोष्टी, शिकवणी मला माझ्या आई-वडिलांकडून शिकता आल्या”. (Entertainment news)
पुढे सई म्हणाली की, “माझ्या वडिलांनी सांगितलेल्या दोन गोष्टी माझ्या अजून लक्षात आहेत. कुठलंही काम अंगावर पडलं तरी त्याचा कमीपणा वाटून घ्यायचा नाही. म्हणजे उद्या जर आपल्यावर झाडू मारायची वेळ आली, तरी त्याचा कमीपणा वाटता कामा नये. तेवढ्याच निष्ठेनं ते काम झालं पाहिजे. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की, मी कधीच माझ्या आयुष्यात कुठल्याच पॉइंटला तुझ्यासाठी शिक्षणासाठी कर्ज, पैसे भरून अॅडमिशन किंवा वशिला लावून अॅडमिशन करणार नाही. कारण, त्यांचं म्हणणं होतं आपल्या मेहनतीने काम करत राहिलं पाहिजे आणि मिळवत राहिलं पाहिजे”. (Sai tamhankar news)

Sai Tamhankar हिने पुढे तिच्या खाण्याच्या सवयींबद्दल बोलताना म्हटले की, “मला लहानपणी एका गोष्टीचा राग यायचा की, जर मी आईला सांगितलं की, मला अमुक ही भाजी उद्या डब्याला नको. तर मला दोन दिवस तीच भाजी मिळायची. मला आता कळतंय की त्या गोष्टीमुळे मी सगळ्या भाज्या खाते. मी जगात कुठेही गेले तरी जेवणासाठी माझं कुठे काही अडत नाही”. (Bollywood news update)
सई ताम्हणकरने मराठीत खऱ्या अर्थाने बोल्ड अभिनय काय असतो हे ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटातून आपल्या अभिनयातून सिद्ध केले. ‘हंटर’ चित्रपटापासून हिंदीत तिला मिळालेला ब्रेक ‘ग्राऊंड झिरो’ पर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे लवकरच हिंदीत लीड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर दिसेल तो दिवस दूर नाही असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. (Entertainment update)
===============================
हे देखील वाचा: Sai Tamhankar : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना धुळ चारत सईने केला नवा रेकॉर्ड
===============================
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. महत्वाचं म्हणजे अजय देवगणच्या रेड २ चित्रपटाशी या मराठी चित्रपटाची टक्कर होणार आहे. ‘गुलकंद’ मध्ये सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक (Prasad Oak), ईशा डे, , वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi upcoming film 2025)