Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Yearend movies : यामुळे वर्षअखेरीस चित्रपट केले जातात प्रदर्शित !
महेश कोठारे (Mahesh Kothare) नी बालकलाकार म्हणून छोटा जवान, राजा और रंक (raja aur runk) इत्यादी मराठी व हिंदी चित्रपटातून भूमिका साकारल्यावर ऐन तारुण्यात पदार्पण करताना दिनेश दिग्दर्शित ‘प्रीत तुझी माझी‘ या प्रेमपटात Kasturi Bartake चा रोमॅन्टीक नायक साकारला. हा चित्रपट मुंबईत २६ डिसेंबर १९७५ रोजी गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह, अनुपम (गोरेगाव), सहकार (चेंबूर), अशोक (ठाणे) या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला…
विशेष म्हणजे या चित्रपटाच्या जाहिरातीत महेश कुमार असे म्हटले होते. या चित्रपटाची जाहिरात माझ्या कलेक्शनमध्ये आहे. पुणे शहरातील प्रभात चित्रपटगृहात तो काही आठवडे अगोदरच प्रदर्शित झाला होता. वर्षअखेरीस (Yearend movies) नवीन चित्रपट प्रदर्शित होणे Aamir Khan, Salman Khan वगैरेने रुजवले असे कौतुकाने म्हटले जात असले तरी हा ‘खेळ’ खूपच अगोदरपासूनचा! आणि याबाबत काही लक्षवेधक उदाहरणे द्यायलाच हवीत. (पूर्वी मराठी असो वा हिंदी चित्रपट ते विविध शहरांतून टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत. आपण त्यांची मुंबईतील प्रदर्शनाची तारीख विचारात घेवू यात.) (Bollywood masala)
वर्षअखेरीस (Yearend movies) प्रदर्शित झालेल्या आपल्या मराठी चित्रपटातील एक विशेष उल्लेखनीय उदाहरण, मराठी चित्रपटसृष्टीच्या अतिशय आदर्श अशा कालखंडातील गायत्री चित्र या चित्रपट निर्मिती संस्थेच्या भालजी पेंढारकर यांची निर्मिती, दिग्दर्शत, कथा, पटकथा व संवाद असलेल्या “साधी माणसं” या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास ५९ वर्ष पूर्ण झाली. मुंबईत हा चित्रपट २४ डिसेंबर १९६५ रोजी डाॅ. भडकमकर मार्गावरील स्वस्तिक, लालबागचे भारतमाता, गणेश (मुलुंड), व्यंकटेश (विलेपार्ले) आणि न्यू माॅडेल (कुर्ला) या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
तत्पूर्वीच पुणे शहरात हा चित्रपट १० डिसेंबर १९६५ रोजी विजय आणि खडकी येथील जयहिंद या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष म्हणजे, यातील कलाकारांनी व्यक्तिरेखा प्रभावी ठराव्यात म्हणून रंगभूषा न करता त्यात अभिनय साकारला. या चित्रपटात जयश्री गडकर, सूर्यकांत, मा. विठ्ठल, सुलोचना, बर्चीबहाद्दर, राजशेखर, चंद्रकांत गोखले, माधव साळोखे, वसंत लाटकर, आशा पाटील, चांदबिबी इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. (Yearend movies)
या चित्रपटाची गीते योगेश आणि जगदीश खेबूडकर यांची तर संगीत आनंदघन (म्हणजेच लता मंगेशकर) यांचे आहे. या चित्रपटाचे छायाचित्रणकार अरविंद लाड तर संकलक बाबुराव गोखले आहेत. या कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळातील चित्रपटातील ऐरणीच्या देवा तुला ठिनगी ठिनगी व्हाऊ दे, वाट पाहून जीव शिणला, दिसा मागून दिस टळला, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग, नको देवराया अंत आता पाहू ही सर्व गाणी लोकप्रिय आहेत. (Untold stories)
निर्माता व दिग्दर्शक अनंत माने यांचा “अशीच एक रात्र होती” हा जयश्री गडकर, अरुण सरनाईक, दादा साळवी, राजशेखर, वत्सला देशमुख, गणपत पाटील इत्यादींची भूमिका असलेला रहस्यरंजक कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमागृहात ३१ डिसेंबर १९७१ रोजी प्रदर्शित झाला. याच दिवशी सुबोध मुखर्जी निर्मित व समीर गांगुली दिग्दर्शित ‘शर्मिली‘ (Sharmeelee) हा चित्रपट प्रदर्शित झाला. Shashi Kapoor व राखी (दुहेरी भूमिकेत) यांची भूमिका असलेल्या या चित्रपटातील रणजीतची व्हीलनगिरी खूपच गाजली. (Yearend movies)
रणजीतच्या विशेष मुलाखतीचा मला योग आला असता त्याने मला सांगितले, दिल्लीतील या चित्रपटाच्या प्रीमियरला माझे कुटुंबीय मध्यंतरलाच घरी निघून गेले. कारण काय तर या चित्रपटात मी राखीवर जबरदस्ती करतो हा प्रसंग त्यांना अजिबात रुचला नाही. चित्रपटात मी अशी कामे करणार हेच त्यांना पटत नव्हते. त्यांची समजूत घातल्यावर घरातला तणाव निवळला. याच चित्रपटाच्या खणखणीत सुपर हिट यशानंतर रणजीतकडे चित्रपटांची चक्क रांग लागली. सचिन देव बर्मन (S. D. Burman) यांच्या संगीतातील सर्वच “शर्मिली गाणी” श्रवणीय. मुंबईत अप्सरा चित्रपटगृहात रौप्य महोत्सवी यश संपादले. ओ मेरी शर्मिली… हिंदी चित्रपट संगीत हा समाजातील सर्वच स्तरावर लोकप्रिय कला प्रकार. (Yearend movies)
वर्षअखेरीस प्रदर्शित चित्रपटात विशेष उल्लेखनीय शशधर मुखर्जी निर्मित व नासिर हुसेन दिग्दर्शित ‘तुमसा नही देखा‘ (Tumsa Nahin Dekha) (२७ डिसेंबर १९५७) हा म्युझिकल सुपरहिट चित्रपट. Shammi Kapoor ने प्रत्येक गाण्यात आपल्या विशिष्ट अदांनी भारीच रंग भरला. जोडीला अनिता. या चित्रपटातील O. P. Nayyar यांच्या संगीतातील आशा भोसले व मोहम्मद रफी यांनी अतिशय उत्फूर्तपणे गायलेली गाणी कधीही ऐकावीत. तीच धमाल, तशीच मस्ती. जवानी ये मस्त मस्त, छुपनेवाले सामने आ, आये है दूर से मिलने हुजूर से, देखो कसम से कहते है, यू तो हमने लाख हंसी देखे है तुमसा नहीं देखा, सर पर टोपी लाल हाथ मे रेशम का रुमाल प्रत्येक गाणे लोकप्रिय. त्या काळातील अनेक चित्रपटांतील सर्वच्या सर्व गाणी भारी असत. ती गाणी पुन्हा पुन्हा पहायला चित्रपट रसिक पुन्हा पुन्हा चित्रपटगृहात जात. (Yearend movies)
Raaj Kumarची अतिशय लक्षवेधक एन्ट्री असणारा “वासना” (Vaasna) हा चित्रपट २७ डिसेंबर १९६८ रोजी प्रदर्शित झाला. टी. प्रकाश राव दिग्दर्शित या चित्रपटात पद्ममिनी, विश्वजीत, कुमुद छुगानी इत्यादींच्याही भूमिका आहेत. राजेंद्रकुमार, बबिता, प्रेम चोप्रा, प्राण यांची भूमिका असलेला Mohan Kumar दिग्दर्शित ‘अंजाना‘ २६ डिसेंबर १९६९ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. आनंद बक्षी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. रिमझिम के गीत सावन आये, जान चली जाए, वो कौन है ही गाणी लोकप्रिय आहेत. (Yearend movies)
धर्मेंद्र व तनुजा यांची भूमिका असलेला राज खोसला प्राॅडक्सन्सचा पद्मनाभ दिग्दर्शित ‘दो चोर‘ २९ डिसेंबर १९७२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातीलही गाणी आजही लोकप्रिय आहेत. काली पलक तेरी गोरी खुलने लगी है थोडी थोडी, मेरी जा मेरी जा कहेना मानो, यारी हो गयी यार से, चाहे रहो दूर चाहे रहो पास ही सगळीच गाणी सुपरहिट. आर. डी. बर्मन फाॅर्मात. हम जहा खडे होते है… लाईन वहीं से शुरु होती है हा अमिताभ बच्चनचा गाजलेला डायलॉग असलेला टीनू आनंद दिग्दर्शित ‘कालिया‘ १९८१ च्या ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आपने जेल की दीवारों और जंजिरो का लोहा देखा है जेलर साब… कालिया की हिंमत का फौलाद नहीं देखा असे एकेक भारी डायलॉग ऐकण्यासाठी त्या काळातील पब्लिक पुन्हा पुन्हा चित्रपटगृहाची वारी करीत. (Yearend movies)
याच दिवशी ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नौकरी‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आरएसजे कम्बाईन या चित्रपट निर्मिती संस्थेचा हा चित्रपट दुर्दैवाने फार रखडत रखडत पडद्यावर आला. Raj Kapoor व राजेश खन्ना एकत्र हे या चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरले असते. पण राजेश खन्नाचा हा पडत्या काळात सेटवर गेलेला चित्रपट होता. याच दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर १९८१ रोजी अरुण कर्नाटकी दिग्दर्शित ‘रानपाखरं’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. हा चित्रपट १४ ऑगस्ट १९८० रोजी सेन्सॉर संमत झालाय. पण पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी, नांदेड, ओझर वगैरे अनेक ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत होत तो मुंबईत आला. त्या काळात अनेक चित्रपट याच पध्दतीनुसार प्रदर्शित होत. या चित्रपटात उषा चव्हाण, मधु कांबिकर, राजा गोसावी, यशवंत दत्त, निळू फुले इत्यादीच्या भूमिका आहेत. मुंबईत भारतमाता चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला.
==========
हे देखील वाचा : Jaanwar Movie : ‘या’ चित्रपटाला पंचवीस वर्ष पूर्ण.
==========
१९८९ च्या अखेरीस म्हणजे २९ डिसेंबर रोजी राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘मैने प्यार किया‘ फर्स्ट शोपासूनच सुपर हिट. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना वरळीतील सत्यम चित्रपटगृहात काॅमन मॅन अर्थात चित्रपट रसिकांसोबत चित्रपट दाखवला. प्रत्येक गाण्याला मिळत असलेला पब्लिक रिस्पॉन्सच सांगत होता पिक्चर हमखास पंचवीस आठवडे मुक्काम करणार. हा चित्रपट भाग्यश्री पटवर्धनच्या उत्फूर्त अदाकारीने ओळखलाच जात होता. सलमान खान हिरो असूनही श्रेय नायिकेचा मिळत होते आणि आपल्या लक्ष्मीकांत बेर्डेचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट. (Yearend movies)
क….क… क… किरण तुम सिर्फ मेरी हो असे अतिशय आक्रमकपणे (की विकृतपणे?) बोलणारा Shah Rukh Khan यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर‘ने जबरदस्त फाॅर्मात आला. हा चित्रपट २४ डिसेंबर १९९३ रोजी प्रदर्शित झाला. नायकावर अर्थात सनी देओलवर शाहरुख सहजी मात करण्यात यशस्वी ठरला. यावरुन गाॅसिप्स मॅगझिनमधून बरेच लिहिले गेले. अक्षय कुमारची हुकमी ओळख ‘खिलाडी‘. तेच त्याचे ब्रॅण्ड नेम. त्यातील ‘खिलाडी 420’ हा ॲक्शनपॅक्ड मसालेदार मनोरंजक चित्रपट २९ डिसेंबर २००० रोजी प्रदर्शित झाला.
वर्षअखेरीस प्रदर्शित झालेला असाच एक मराठी चित्रपट…
अशोक सराफ (Ashok Saraf) च्या प्रोफेसर धोंड या धमाल व्यक्तिरेखेने गाजलेल्या व्ही. के. नाईक दिग्दर्शित ‘गुपचूप गुपचूप‘ (मुंबईत रिलीज ३० डिसेंबर १९८३). हा प्रोफेसर धोंड गोव्याचा सारस्वत. मधूनच ‘किन्या गो’ म्हणत कोकणीत हेल काढणारा आणि दोन्ही हाताच्या कोपरांनी खाली सरकणारी पॅन्ट सारखीवर करणारा. तो रावसाहेबांच्या मुलीच्या (रंजना) प्रेमात पडतो. ती त्याची विद्यार्थीनी. ती सांगेल तसं तो वागू लागतो. तिला खुश करण्याचा एकही प्रसंग हा भाबडा जीव सोडत नाही. एकदा तो रोमियोचा वेष धारण करुन काॅलेजला येतो. अनेक विदुषी चाळे तो करतो. यातून निर्माण होणारे विनोद म्हणजे हा धमाल चित्रपट. (Yearend movies)
निर्माते किशोर मिस्कीन यांच्या शिवशक्ती प्राॅडक्सन्स या बॅनरखाली निर्माण झालेला हा मजेशीर चित्रपट २२ डिसेंबर १९८३ रोजी सेन्सॉर संमत झाला आणि मग ३० डिसेंबर रोजी मुंबईत प्लाझा (दादर), न्यू प्रकाश (कुर्ला), वंदना (ठाणे), सपना (वसई), मेघदूत (वाशी) येथे प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद मधुसूदन कालेलकर यांचे आहेत. गीते मधुसूदन कालेलकर, शांताराम नांदगावकर व उमाकांत काणेकर यांची असून संगीत अनिल अरुण यांचे आहे. चित्रपटाचे छायाचित्रणकार सूर्यकांत लवंदे असून संकलन संजीव नाईक यांचे आहे. कला दिग्दर्शक शरद पोळ आहेत.
==========
हे देखील वाचा : लांबलचक चित्रपट “पैसा वसूल” की ‘टाईम फूकट’ची खात्री?
==========
या चित्रपटात अशोक सराफ, रंजना, डाॅ. श्रीराम लागू, कुलदीप पवार, महेश कोठारे, शरद तळवळकर, पद्मा चव्हाण, आशालता बावगावकर, सुरेश भागवत, गुड्डी मारुती , अनंत मिराशी, पाहुणे कलाकार अरुण सरनाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील सांग मी तुजला काय देऊ ऐशा मोक्याला, ये ना घे ना जवळ बेना, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, गुपचूप गुपचूप स्वप्नात येऊन ही गाणी लोकप्रिय ठरली.
नवीन वर्षाची सुरुवात ही जशी विशेष उल्लेखनीय गोष्ट तसेच त्या वर्षाचा शेवट हीदेखील एक वेगळ्या मूडची गोष्ट आणि त्यात नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची दीर्घकालीन यशस्वी वाटचाल. प्रत्येक वर्षीच हे घडतयं. त्यातील काही उदाहरणे आज सांगावीशी वाटली. त्यातील मराठी चित्रपट विशेष उल्लेखनीय आहेत… (Yearend movies)